Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: १० तोळा सोन्याच्या दरात ११,४०० रुपयांनी वाढ, आज २४ आणि २२ कॅरेटचा भाव किती?

Gold- Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,४०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदी देखील महागली आहे. सोनं खरेदीला जाण्यापूर्वी आजचे दर किती वाचा सविस्तर...

Priya More

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज पुन्हा सोनं आणि चांदीचे दर वाढले आहे. एक तोळा सोनं जीएसटीसह १ लाखांपार गेले आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,१४० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे. आज सोनं आणि चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी किती दर आहेत ते घ्या जाणून...

गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,१४० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला तब्बल १, ०१,२९० रुपये खर्च करावे लागणार आहेत. काल हेच सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,००,१५० रुपये द्यावे लागले. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात आज ११,४०० रुपयांनी वाढ झाली आहे. म्हणजे आज तुम्हाला १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी १०,१२,९०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेट १ तोळा सोन्याच्या दरात १,०५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९२,८५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. काल हेच सोनं ९१,८०० रुपयांना मिळत होते. तर २२ कॅरेटचे १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ९,२८,५०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज वाढ झाली आहे.

१८ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरात आज ८६० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला आज ७५,९७० रुपये द्यावे लागणार आहेत. काल याच सोन्याचे दर ७५,११० रुपये इतके होते. तर हेच १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ७,५०,७०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. आज भारतात चांदीचे दर देखील वाढले आहेत. १ ग्रॅम चांदीमध्ये २ रुपयांनी वाढली असून याचा दर ११८ रुपये झाला आहे. तर १ किलो चांदी २००० रुपयांनी महागली आहे. आज १ किलो चांदीचा दर १,१८,०० रुपये इतक झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benefits of Cinnamon Tea: वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर प्या ही खास चहा, मिळतील हे आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Update: सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चोरट्यांचा डल्ला; 2 लाख 90 हजारांचा मुद्देमाल लंपास

Constipation relief tips: सकाळी उठताच पाणी प्यायल्यास खरोखरच पोट साफ होतं का?

Silent heart attack: शरीरात ही ५ विचित्र लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅकचा आहे धोका

SCROLL FOR NEXT