LPG e-KYC deadline google
बिझनेस

LPG e-KYC Deadline: 30 जूनपर्यंत हे काम उरकून घ्या, अन्यथा सिलेंडर आणि सबसिडीही मिळणार नाही

Gas Cylinder Subsidy Update: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ३० जूनआधी ई-केवायसी पूर्ण केली नाही तर गॅस सिलेंडर आणि सबसिडी मिळण्यात अडचण येऊ शकतात.

Sakshi Sunil Jadhav

घरामध्ये आपल्याला स्वयंपाकासाठी LPG सिलेंडरचा वापर करावा लागतो. नुकतेच सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. त्यात सिलेंडरचा कालावधीही वाढवण्यात आला. उन्हाच्या कडाक्यात नागरिकांना लांबच्या लांब रांगा लावून उभं राहावं लागलं होतं. आता नवीन माहिती समोर आली आहे.

कोणत्या नागरिकांना सिलेंडर मिळणार नाही?

आता नागरिकांना ई- केवायसी केल्याशिवाय LPG सिलेंडर दिला जाणार नाही. तुम्ही भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडेन असे कोणतेही सिलेंडर वापर असाल तरीही हा नियम लागू आहे. नागरिकांना यासाठी ३० जूनपर्यंत मूदत देण्यात आली आहे.

सिलेंडरची ही सेवा होणार बंद

तुम्हाला जर LPG सबसिडीची सेवा मिळत असेल तर आत्ताच ई-केवायसी पूर्ण करून घ्या. तुम्ही ही प्रोसेस घरबसल्या सुद्धा पूर्ण करू शकता. ज्या ग्राहकांना सबसिडी मिळते, त्यांना Biometric Authentication आधारित ई-केवायसी करणं अनिवार्य केलं आहे.

तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम https;//www.pmuy.gov.in/e-kyc.html या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तुम्ही स्मार्ट फोनवर ही प्रोसेस पूर्ण करू शकता. पुढे तुमच्या तेल वितरण कंपनीचं अॅप आणि आधार अॅप आरडी डाउनलोड करावे लागेल. नंतर तिथे मागितली जाणारी सर्व माहिती द्या. तुम्हाला यामध्ये फेस स्कॅन करावा लागेल. यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण होईल. या प्रोससने तुमचं ई- केवायसी होईल आणि तुम्हाला वेळच्या वेळी LPG सिलेंडर उपलब्ध होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: राज्यातील कोणत्या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर, तुमच्या गावाचा समावेश आहे का? पाहा संपूर्ण यादी

Maharashtra News Live Update: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

7 Best Oils for Hair Growth: केसांच्या वाढीसाठी 7 तेल

Govinda Affair: 'माझं घर विनाकारण तुटतंय...'; गोविंदाच्या रुमर्ड अफेअरमुळे सुनीता आहुजा हैराण

राजकारणातील मोठी बातमी; बंडखोर खासदारांसंदर्भात लोकसभा अध्यक्षांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT