

सध्याच्या महागाईच्या दुनियेत पैसा खिशात टिकत नाही. भविष्यात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांना याचा सगळ्यात जास्त फटका बसतो. त्यामुळे तुमच्या पगारातली काही रक्कम तुम्ही भविष्यासाठी गुंतवू शकता. ही रक्कम तुम्हाला मॅच्युरिटीनंतर पाहिजे तेव्हा काढता येते. तसेच तुम्हाला त्याचं मोठ्या रक्कमेत व्याज सुद्धा दिलं जातं. पुढे आपण पोस्टाच्या अशाच एका जबरदस्त योजनेबाबत जाणून घेणार आहोत.
केंद्र सरकारच्या पोस्ट ऑफिसमध्ये सुरक्षितपणे पैसे गुंतवले जातात. त्यामुळे यात तुमचे पैसे सुरक्षित राहतात. तसेच चांगला परतावाही दिला जातो. यामध्ये तुमच्या सोयीनुसार हव्या योजनेत गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही मोठ्या रक्कमेवर भरपूर व्याज मिळवायचं असेल तर पुढील माहिती वाचा.
पोस्टाच्या टाइम डिपॉझिट (TD) योजनेत म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट (FD) योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते. वर्षानुसार तुमचा व्याजाचा दर ठरवला जातो. जर तुम्ही 1 वर्षे पैसे गुंतवलेत तर तुम्हाला 6.9 टक्के, 2 वर्षांसाठी 7.0 टक्के, 3 वर्षांसाठी 7.1 टक्के आणि 5 वर्षांच्या ठेव योजनेवर 7.5 टक्के इतकं व्याज दिलं जातं.
गुंतवणुकदारांना या योजनेत समान व्याजदर मिळतं. बऱ्याच बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज दिलं जातं. पण पोस्टाच्या या टाइम डिपॉझिट योजनेत वयाची कोणतीच अट नाही. सर्वांना समान दराने व्याज दिलं जातं.
जर तुम्ही पोस्टाच्या 5 वर्षांच्या टाइम डिपॉझिट या योजनेत ₹2,00,022 ही रक्कम गुंतवली असेल. तर मॅच्युरीनंतर तुम्हाला एकूण ₹2,90,022 इतकी रक्कम मिळू शकते. म्हणजेच मूळ गुंतवणुकीवर जवळपास ₹90,000 इतकं निश्चित व्याज मिळेल. महत्वाचं म्हणजे, या योजनेत फक्त ₹1,000 पासून गुंतवणूक सुरू करता येते. ही छोटी सुरुवात तुम्हाला भविष्यात खूप फायदेशीर ठरू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.