Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: कमी गुंतवणूक अन् भरघोस परतावा; पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनांमध्ये आजच गुंतवणूक करा

Post Office Scheme For Investment: सध्याच्या काळात पैशांची बचत करणे खूप महत्त्वाचे आहे. पैशांची बचत करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करु शकतात. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्याच्या काळात पैशांची बचत करणे खूप महत्त्वाचे आहे. भविष्यात कधी अडचण येईल ते सांगता येत नाही. त्यामुळे वेळेवर पैशांची बचत करायला हवी. पैशांची बचत करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करु शकतात. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित असते. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला अधिक व्याज मिळेल. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

किसान विकास पत्र

किसान विकास पत्र या योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक ७.५ टक्के व्याज मिळेल. या योजनेत जर तुम्ही ९ वर्ष ७ महिन्यांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक केली तर तुमची गुंतवलेली रक्कम दुप्पट होईल. या योजनेत गुंतवणूकीसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या योजनेत तुम्ही १००० रुपयांपेक्षा कमी रक्कम गुंतवू शकत नाही.

नॅशनल सेव्हिंग टाईम डिपॉझिट खाते

या योजनेत तुम्ही एक, दोन, तीन आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात. जर तुम्ही १ वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला ६.९ टक्के व्याजदर मिळेल. दोन वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास ७ टक्के तर ३ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास ७.१ टक्के व्याजदर मिळेल. या योजनेत तुम्ही १००० रुपयांची गुंतवणूक करु शकतात.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme)

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहे. यात तुम्हाला वार्ष्त ८.२ टक्के व्याज मिळेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला हे पैसे मिळतील. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वय ६० वर्षे असणे गरजेचे आहे.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

या योजनेत तुम्हाला वार्षिक ७.७ टक्के व्याज मिळेल. मॅच्युरिटीनंतर ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : राज ठाकरे-उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी रवाना, थोड्याच वेळात तोफ धडाडणार

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT