Dryfruits Prices Increases Saam Tv
बिझनेस

Diwali : दिवाळीत महागाईचा भडका, फराळ महागला; सुक्या मेव्यासह, तेल आणि डाळींच्या किंमतीत वाढ!

Dryfruits Prices Increases: दिवाळीला काही दिवसांनी सुरुवात होणार आहे. दिवाळीनिमित्त घरोघरी फराळ बनवायला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या आधीच फराळाच्या किंमतीत वाढ झाली आहे.

Siddhi Hande

दिवाळीचा अवघे काही दिवस उरले आहेत. दिवाळीला सर्वांच्या घरी फराळ बनवला जातो. घराघरात फराळ बनवण्यासाठी सुरुवात झाली आहे. फराळात सर्वात जास्त सुकामेवा वापरला जातो. सध्या सुका मेव्याचे भाव वाढले आहेत. त्याचसोबत तेल, तूप, रवा साखर, खोबरे यांच्याही दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

तेल,तूप, साखर, गूळ, रवा यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुका मेव्याच्या किंमतीत पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या काजू घाऊक बाजारात ८९५ रुपये प्रतिकिलोवर विकले जात आहे.

सध्या किरकोळ बाजारात काजूचे दर १,१०० रुपये आहे. चोरोळीचा दर २,५०० रुपये आहे. वेलची ३,००० किलोवर विकली जात आहे. खजूर किरकोळ बाजारात २०० रुपयांवर विकले जात आहे. पिस्ता घाऊक बाजारात १०९० रुपयांवर विकले जात आबे. तर किरकोळ बाजारात १८०० रुपये प्रति किलोवर विकले जात आहेत.

घाऊक बाजारात मनुके २०० रुपयांवर विकले जात आहे तर किरकोळ बाजारात ३०० रुपये किलोवर विकले जात आहे. सुका मेव्यासह फराळाचे साहित्य महाग झाले आहे. त्यामुळे आता सुका मेवा घेताना खरेदीदारांच्या खिशाला चांगला फटका बसला आहे. (Dryfruits Price Increases)

तेल, खोबऱ्यांसह डाळीदेखील महाग झाल्या आहेत. सध्या मिठाईपेक्षा सुका मेव्याचे भाव जास्त आहेत. अनेकजण नातेवाईकांना सुका मेवा गिफ्ट म्हणून दिले जातात.सुका मेव्याच्या बॉक्सच्या किंमती ५०० रुपयांपासून सुरु आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगला फटका बसला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मिलिंद नरोटे यांना भाजपकडून गडचिरोलीतून उमेदवारी

Vastu Tips: धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ करेल मालामाला; करा 'हे' उपाय

Railway Rule: रेल्वे सुटल्यानंतर त्याच तिकीटवर दुसऱ्या ट्रेनने प्रवास करता येतो? काय आहे रेल्वेचा नियम

Nashik Shocking : नाशिकमध्ये माय-लेकासह मामाचा नदीत बुडून मृत्यू; दिवाळीच्या तोंडावर कुटुंबावर शोककळा

Hill Station : उंच शिखर अन् चहूबाजूंनी जंगल, हिवाळ्यात 'या' हिल स्टेशनचं सौंदर्य पाहाच

SCROLL FOR NEXT