भारतात आता सणउत्सवाला सुरुवात झाली आहे. दिवाळी याच महिन्यात सुरू होत आहे. दिवळी सण वर्षातील सर्वात मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. दिवळीनिमित्त प्रत्येकाच्या घरी विविध गिफ्ट्स येतात. चॉकलेट्स आणि ड्रायफ्रूट्स प्रत्येकजण आपल्या ओळखीच्या व्यक्तींना गिफ्ट स्वरूपात देतात.
सण उत्सवात मिठाईसह विविध पदार्थांमध्ये दुकानदार मोठी भेसळ करतात. तुपापासून ते अगदी आता काजूपर्यंत भेसळयुक्त गोष्टी बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. दिवाळीत काजूची मोठ्याप्रमाणात खरेदी होते. व्यक्ती भाजलेले काजू स्नॅक्स स्वरूपात खातात. तर फराळाच्या विविध पदार्थांमध्ये सुद्धा काजू मिक्स केले जातात. त्यामुळे काजूमध्ये सुद्धा भेसळ केली जात आहे.
बाजारात सध्या विविध कॉलिटीचे काजू विक्रिसाठी आले आहेत. यातील काही काजू नकली म्हणजे भेसळयुक्त आहेत. असे काजू आहारात आल्याने संबंधित व्यक्तीला विविध आजार जडतात. शिवाय याने कॅन्सर होण्याची देखील शक्यता असते. असे त्यामुळे भेसळयुक्त काजू कोणते आणि चांगले काजू कोणते, हे कसं ओळखायचं याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
काजूच्या रंगावरून सुद्धा काजू असली आहे की नकली हे समजतं. काजू सफेद रंगाचा असतो. त्यामुळे काजू खरेदी करताना त्याचा रंग पिवळसर तर नाही ना हे तपासा. याने एका मिनिटांत समजेल की तुम्ही खरेदी करत असलेला काजू भेसळयुक्त आहे की नाही.
काजू आकार सुद्धा महत्वाचा असतो. नॉर्मली काजू १ इंच लांब आणि थोडासा जाड असतो. आकारावरून सुद्धा तुम्ही खरा काजू कोणता हे ओळखू शकता.
खरा आणि उत्तम कॉलिटीचा काजू इतका चांगला असतो की तो खाताना आपल्या दातांना चिपकत नाही. त्या उलट नकली किंवा भेसळ असलेला काजू खाताना आपल्या दातांना चिटकतो. त्यामुळे दात देखील दुखू लागतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.