Bank MCLR Rate Increases Saam Tv
बिझनेस

Bank MCLR Rate Increases: या राष्ट्रीय बँकेचा ग्राहकांना दणका; कर्जाच्या व्याजदरात मोठी वाढ, होम आणि कार लोनही महागलं

Siddhi Hande

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना लवकरच मोठा झटका बसणार आहे. बँकेने MCLR वाढवले आहे. बँकेने ३ महिने, ६ महिने आणि १ वर्षाच्या कालावधीसाठी आपल्या लेंडिंग रेट्समध्ये 5bps पॉइंटसची वाढ केली आहे. हे नवे दर १२ ऑगस्ट २०२४ पासून लागू होणाार आहेत.

याचसोबत बँक मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेडिंग रेट्स (MCLR) वाढवण्यात आले आहे. त्यामुळे कर्जदारांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे.

बँक ऑफ बडोदाने आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिग रेट्स (MCLR) मध्ये बदल केले आहे, असं सांगितले होते. हे नवे दर १२ ऑगस्ट २०२४ पासून लागू होणार आहे. बँक फायलिंगनुसार, बँक ऑफ बडोदाने ३ महिन्यांच्या एमसीएलआर (MCLR)मध्ये ८.४५ वरुन ८.५० टक्के करण्यात येणार आहे. तर ६ महिन्यांच्या(MCLR)मध्ये ८.७० टक्क्यांवरुन ८.४५ टक्के वाढवण्यात येणार आहे. तर १ वर्षाच्या कालावधीसाठी एमसीएलआर ८.९० टक्क्यांवरुन ८.९५ टक्के करण्यात येणार आहे. प्रत्येक कालावधीसाठी ५ वेसिस पॉइंट वाढवण्यात आले आहेत.

एक बेसिस पॉइंट हा टक्केवारीचा १०० वा हिस्सा असतो. त्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. बँक ऑफ बडोदाने आपले MCLR ८.१५ टक्क्यावरुन वाढवून ८.३५ टक्के केले आहे. यामुळे ग्राहकांचा ईएमआय वाढणार आहे. याबाबत मनी कंट्रोलने वृत्त दिले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१६ साली MCLR जाहीर केला होता. MCLR हे एक बेंचमार्क व्याजदर आहे. हे दर बँक आपल्या लेडिंग रेट्सनुसार ठरवते. बँक या दरावर ग्राहकांना लोन देतो. MCLR वाढल्याने ग्राहकांचे व्याजदर वाढणार आहे. त्यामुळे ईएमआय भरताना सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath News: केंद्राचा मोठा निर्णय, अंबरनाथमधील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या १०० जागांना मंजुरी, अ‍ॅडमिशन सुरु

Viral News: अरे बापरे! गरबा खेळताना तरुणाच्या अंगात अचानक लागले लाईट्स? व्हायरल VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

SBI Scheme: स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! ४०० दिवसांच्या एफडीमध्ये गुंतवणुकीचा कालावधी वाढवला

Nitrogen Smoke Biscuit : सावधान! तोंडातून धूर सोडणारी बिस्किटे खाताय? जडतील गंभीर आजार, पाहा VIDEO

New Internship Scheme: लाडक्या बहिणीनंतर आता भावांचा नंबर, तरुणांना दर महिन्याला मिळणार ५००० रुपये; जाणून घ्या कसे?

SCROLL FOR NEXT