Bank Locker Rule: बँकेच्या लॉकरमधून तुमची मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यास जबाबदार कोण? तक्रार कुठे करायची? जाणून घ्या बँकाचे नियम

Who Is Responsible For Bank Locker Theft: बँकेच्या लॉकरमध्ये अनेकजण मौल्यवान वस्तू ठेवतात. बँकेत या गोष्टी सुरक्षित असतात. जर तुमच्या बँक लॉकरमधूल या गोष्टी चोरीला गेल्या तर काय करावे. याबाबत माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
Bank Locker Rule
Bank Locker RuleSaam Tv
Published On

प्रत्येकाच्या घरात मौल्यवान वस्तू असतात. यात सोने-चांदीचे दागिने किंवा रोख रक्कम असते. जास्त रोख रक्कम किंवा सोने-चांदीचे दागिने घरात ठेवणे हे खूप धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे सोने-चांदीसारख्या मौल्यवान वस्तू या बँकेत लॉकरमध्ये ठेवाव्यात. बँकेत लॉकरमध्ये आपल्या मौल्यवान वस्तू या सुरक्षित असतात. तिथे चोरी होण्याच जास्त शक्यता नसते. त्यामुळे बँकाच्या लॉकरमध्ये सोने-चांदीच्या वस्तू ठेवण्यास सर्वसामान्य लोक प्राधान्य देतात. परंतु तुम्ही लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू खरंच सुरक्षित आहेत का? लॉकरमधून वस्तू घायाळ झाल्या तर काय कराल? यासाठी तुम्हाला बँकेचे नियम माहित असणे गरजेचे आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, बँकाच्या लॉकरचा वापर तुम्ही फक्त काही कामांसाठीच करु शकतात. यामध्ये तुम्ही सोने-चांदीचे दागिने किंवा रोख रक्कम ठेवू शकतात.या लॉकरमध्ये तुम्ही काही महत्त्वाची कागदपत्रेदेखील ठेवू शकतात.

Bank Locker Rule
ITR Filling: ३१ जुलैपूर्वी ITR फाइल करु शकला नाहीत? होऊ शकतो तुरुंगवास; जाणून घ्या सविस्तर

बँक लॉकरचे नियम काय आहेत?

बँकाच्या नवीन नियमांनुसार, बँकाना रिकाम्या लॉकरची यादी दाखवणे गरजेचे आहे. याशिवाय बँकाना लॉकरसाठी ग्राहकांकडून एकाचवेळी ३ वर्षांचे भाडे द्यावे लागते. जर या वर्षांमध्ये ग्राहकांच्या वस्तूंचे नुकसान झाले तर बँका त्यांच्या अटींचा हवाला देऊन भरपाईसाठी नकार देऊ शकत नाही. बँकाना पूर्ण भरपाई द्यावी लागणार आहे. त्यामुळे बँकाना करार करताना हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, कोणतीही अयोग्य अट नाही. जेणेकरुन ग्राहकांचे नुकसान झाल्यास बँकाना त्रास होणार नाही.

Bank Locker Rule
Ransomware Attack On Banks: ३०० बँकांची UPI, ATM सेवा तात्पुरती बंद; सर्व्हरमध्ये घुसला व्हायरस; तुमचं UPI पेमेंट सुरु आहे का?

बँकेच्या लॉकरसाठी दोन चाव्या

बँकेच्या लॉकरसाठी दोन चाव्या असतात. त्यातील एक चावी ही ग्राहकाकडे असते तर दुसरी चावी बँकेच्या मॅनेजमेंटकडे असते. या दोन व्यक्तींकडूनच बँकेचे लॉकर उघडता येईल.

बँक लॉकरमध्ये काय ठेवता येणार नाही?

बँकेच्या लॉकरमध्ये तुम्ही रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू ठेवू शकतात. कोणत्याही प्रकारचे शस्त्रे, ड्रग्ज या वस्तू लॉकरमध्ये ठेवता येणार नाही. यामुळे बँकेला धोका निर्माण होऊ शकतो.

Bank Locker Rule
Bank Of India Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी; नोकरीसाठी पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com