how many Bank Transactions in year, Banking News  Saam Tv
बिझनेस

Bank News: बँकेतून मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढताय? भरावा लागेल दंड, वाचा सविस्तर

Bank Transaction : बँकेतून पैसै काढण्यासाठी काही नियम असतात. पैसे काढताना काही मर्यादा असते. तुम्ही काही ठराविक रक्कम वर्षभरात बँकेतून काढू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bank Transaction Limit:

आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँक हा सर्वोत्तम पर्याय आहे. बँकेत आपण आपले पैसे ठेवतो. आपल्याला गरज असल्या बँकेतून पैसे काढतो. बँकेतून पैसै काढण्यासाठी काही नियम असतात. त्यानुसार तुम्ही पैसे काढू शकतात. पैसे काढताना काही मर्यादा असते. तुम्ही काही ठराविक रक्कम बँकेतून काढू शकता.

मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे बँकेचे नियम समजून घ्यायला हवेत. बँकेतून पैसे काढताना एका वर्षात किती रक्कम काढता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Money Withdrawal limit from Bank)

रोख रक्कम किती काढता येणार

अनेकांचा असा समज असतो की, बँकेतून आपण कितीही रक्कम विनामूल्य काढू शकतो. परंतु आयकर कलम 194N अंतर्गत, एखाद्या व्यक्तीने एका वर्षात २० लाखांपेक्षा जास्त रक्कम काढली तर त्यांना TDS भरावा लागेल. ज्या लोकांनी सलग ३ वर्षे इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही त्यांना हा नियम लागू आहे. या लोकांना कोणत्याही बँक, पोस्ट ऑफिसमधून २० लाखांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.

आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी नियम

आयटीआर भरणाऱ्या लोकांसाठी हा नियम वेगळा आहे. नियमित आयटीआर (ITR) भरणारे लोक एका वर्षात १ कोटी रुपयांपर्यंत रोख (Cash) रक्कम काढू शकतात.

किती TDS भरावा लागेल?

नियमानुसार, तुम्ही बँक खात्यातून १ कोटींपेक्षा जास्त रक्कम काढल्यास २ टक्के TDS कापला जाईल. जर तुम्ही मागील ३ वर्षांत आयटीआर भरला नसेल तर तुम्हाला २० लाखांपेक्षा जास्त पैसे काढल्यावर २ टक्के TDS आणि १ कोटींपेक्षा जास्त रक्कम काढल्यास 5 टक्के TDS भरावा लागेल.

एटीएमचे नियम

एटीएममधून मर्यादापेक्षा जास्त पैसे काढल्यास बँका शुल्क आकारतात. RBI ने 1 जानेवारी 2022 मधून एटीएममधून पैसे काढण्यावर शुल्क वाढवण्यात आले आहे. बँकामधून मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढल्यास प्रत्येक व्यवहारासाठी २१ रुपये आकारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT