Bank Holidays Saam Tv
बिझनेस

Bank Holidays: उद्यापासून सलग ४ दिवस बँका बंद, RBIने का दिली २७ आणि ३० तारखेला सुट्टी?

Bank Holidays List From 27th June: उद्या देशातील काही बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे उद्या बँकेत जर काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी पाहूनच बँकेत जा.

Siddhi Hande

बँकेत जर तुमचे काही काम असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. उद्या शुक्रवारी बँक बंद राहणार आहे. शुक्रवारी २७ जून रोजी सर्व सरकारी आणि प्रायव्हेट सेक्टरमधील बँका बंद राहणार आहे. जर तुम्ही उद्या बँकेत जाऊन कोणते काम करणार असाल तर जाऊ नका. देशातील दोन राज्यांमध्येच बँका बंद राहणार आहेत. इतर राज्यांमधील बँका सुरु असणार आहे.

या दोन राज्यातील बँका बंद

शुक्रवारी ओडिशा आणि मणिपूरमधील बँका बंद राहणार आहेत. रथयात्रानिमित्त या बँका बंद राहणार आहेत. हा सण ओडिशामधील पुरीमधील भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लाखो भाविक या यात्रेनिमित्त जमतात. मणिपुरमध्ये याला कांग या नावाने ओळखले जाते. हा एक सण आहे. या दिवशी दोन्ही राज्यांमध्ये सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या या दोन्ही राज्यातील पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरमधील बँका बंद राहणार आहेत.

जर तुम्ही ओडिशा आणि मणिपुरमध्येराहत असाल तर उद्या बँकेत जाऊ नका. उद्या बँका बंद असणार आहेत.

बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट

२७ जून (शुक्रवार)- रथ यात्रा/कांगनिमित्त ओडिशा आणि मणिपुरमधील बँका बंद

३० जून (सोमवार)- मिझोराममधील बँका बंद

२८ जून (चौथा शनिवार)

२९ जून (रविवार)

डिजिटल बँकिंग सेवा सुरु

जरी बँकांना सलग सुट्ट्या असल्या तरीही डिजिटल बँकिंग सेवा सुरु राहणार आहे. मोबाईल अॅप, वॉलेट आणि एटीएम सेवा सुरु राहणार आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन, यूपीआयद्वारे ट्रान्झॅक्शन करु शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यातील गणेशोत्सव २४ तास खुला ठेवण्याची मागणी; पालिका काय निर्णय घेणार? VIDEO

Shanaya Kapoor: जेन झी मुलींनी ग्लॅमरस लूकसाठी फॉलो करा शनाया कपूरच्या स्टायलिंग टिप्स

Phodniche Varan Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा खमंग फोडणीचे वरण, जिभेवर चव रेंगाळत राहील

UPI Loan : आता UPI द्वारे मिनिटांत मिळणार लोन! ही आहे संपूर्ण प्रोसेस

Teddy Name History : 'टेडी' हे नाव कसं पडलं? अस्वलाशी आहे संबंध

SCROLL FOR NEXT