
१५ जूनपासूनच शाळा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु झाल्यानंतर आता शाळांच्या वर्षभरातील सुट्ट्यांची यादीदेखील जाहीर झाली आहे. राज्यातील सर्व शाळांना एकूण १२८ दिवस सुट्ट्या असणार आहे. यामध्ये सणवार आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या समावेश आहे. रविवारच्या सुट्ट्यांचादेखील यात समावेश आहे.
आता विद्यार्थ्यांना वर्षभरात किती आणि कधी सुट्टी असणार याची यादी जारी करण्यात आली आहे. ५२ रविवार वगळून वर्षभरात एकूण ७६ सुट्या असणार आहेत. त्यात दिवाळीच्या 10 दिवस आणि उन्हाळ्याच्या 38 दिवस सुट्या असणार आहेत.
दिवाळीच्या सुट्ट्या दहा दिवस म्हणजेच (१६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत) असणार आहे. उन्हाळ्याच्या ३८ दिवस सुट्ट्या असणार आहे. (२ मे ते १३ जून २०२६) पर्यंत या सुट्ट्या असणार आहेत.
जिल्हा परिषदेची शाळा सकाळी साडेदहा वाता भरणार आहे आणि संध्याकाळी ५ वाजता सुटणार आहे. तर अर्धवेळीची शाळा नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे. शाळेच्या दिवशी ६० मिनिटांची सुट्टी असणार आहे. तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात १०-१० मिनिटांच्या दोन सुट्ट्या असणार आहे.
वर्षभरातील सुट्ट्या
जुलै : आषाढी एकदशी, मोहरम, नागपंचमी
ऑगस्ट : रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी
सप्टेंबर : गौरी विसर्जन, ईद-ए- मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना
ऑक्टोबर : गांधी जयंती आणि दिवाळीची सुट्टी
नोव्हेंबर : गुरूनानक जयंती
डिसेंबर : ख्रिसमस- नाताळ
जानेवारी : मकरसंक्रांती, शबे- ए- मेराज, प्रजासत्ताक दिन
फेब्रुवारी : शब-ए-बरात, महाशिवरात्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती
मार्च : धुलिवंदन, रंगपंचमी, शब-ए-कदर, गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती
एप्रिल : गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
मे : महाराष्ट्र दिन, उन्हाळा सुट्टी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.