School Van Accident : आरटीओ अधिकारी पाहून व्हॅन सुसाट पळविली; विद्यार्थांनी भरलेल्या व्हॅनला अपघात, विद्यार्थी जखमी

Ambarnath News : अंबरनाथमध्ये खासगी व्हॅनमधून विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक सुरू असल्याची बाब समोर आली होती. या पार्श्वभूमीवर आरटीओने सोमवारी अंबरनाथ पश्चिमेच्या फातिमा शाळेबाहेर कारवाई सुरू केली होती
Accident
AccidentSaam tv
Published On

अंबरनाथ : विद्यार्थ्यांना ने- आण करण्यासाठी पालक व्हॅन किंवा रिक्षा करतात. मात्र या व्हॅन चालकांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाची पर्वा न करता आरटीओ अधिकारी दिसताच सुसाट वेगाने व्हॅन घेऊन गेला. पुढे जाऊन विद्यार्थ्यांनी भरलेल्या या व्हॅनचा अपघात झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी विद्यार्थी या अपघातात जखमी झाले आहेत. 

अंबरनाथ पश्चिमेला हा संतापजनक प्रकार घडला आहे. मुळात शाळेत मुलांना ने- आण करण्यासाठी पालकांनी रिक्षा किंवा व्हॅन लावलेल्या आहेत. अर्थात मुलांना नेताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी हि चालकाची असते. मात्र काही चालकांकडून बेजबाबदारपणा करत असतात. अशातच अंबरनाथमध्ये खासगी इको व्हॅनमधून विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक सुरू असल्याची बाब समोर आली होती. या पार्श्वभूमीवर आरटीओने सोमवारी अंबरनाथ पश्चिमेच्या फातिमा शाळेबाहेर कारवाई सुरू केली होती. 

Accident
Cattle Attack : मोकाट जनावरांचा पायी जाणाऱ्यांवर हल्ला; वृद्धाचा मृत्यू, एकजण जखमी

कारवाईच्या भीतीने विरुद्ध दिशेने पळवली व्हॅन 

दरम्यान शाळेच्या जवळ कारवाई करत असलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांना पाहून एका निर्ढावलेल्या व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनी भरलेली व्हॅन विरुद्ध दिशेला टाकून पळवली आणि थेट एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात व्हॅनमधील चिमुकल्या मुलांना इजा झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र व्हॅन चालकाचा हा बेजबाबदारपणा समोर आला आहे. 

Accident
Nashik : पोलीस पत्नीच्या गणवेशाचा गैरवापर; गणवेश घालून पोलिस असल्याची बतावणी, पतीने अनेकाना गंडवले

गुन्हा दाखल करण्याची मागणी 

केवळ हजार पाचशे रुपयांचा दंड चुकवण्यासाठी या व्हॅन चालकाने व्हॅनमधील मुलांचा जीव धोक्यात घातला होता. घटनेची माहिती मिळताच पालक वर्ग घटनास्थळी आले होते. तर घटनेस जबाबदार या व्हॅन चालकावर आता फक्त दंडात्मक कारवाई न करता थेट गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून केली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com