Bank Holidays Google
बिझनेस

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

Bank Holidays in Diwali 2025: दिवाळीत बँकांना अनेक दिवस सुट्ट्या आहेत. बँकेत जर तुमचे काही काम असेल तर तुम्ही ही यादी वाचून जा.

Siddhi Hande

दिवाळीत बँकांच्या सुट्ट्यांची यादी

वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या

बँकेत काही काम असेल तर ही यादी नक्की वाचा

दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळीत शाळांपासून ते बँकांपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. दिवाळीत जर तुमचे बँकेत काही काम असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. दिवाळीत अनेक दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे तुमचे काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी नक्की बघून जा. दरम्यान, काही राज्यात बँकांना सुट्टी नाहीये. त्यामुळे ही बातमी नक्की वाचा.

शनिवारी धनत्रयोदशी सण साजरा करण्यात आला. धनत्रयोदशीच्या दिवशी तिसरा शनिवार होता. त्यामुळे या दिवशी देशातील सर्व बँका सुरु होत्या. फक्त आसाममधील बँकांना सुट्टी होती. काटी बिहू सणानिमित्त आसाममधील बँकांना सुट्टी जाहीर केली होती.

दिवाळीत किती दिवस बँका राहणार बंद? (Bank Holidays Diwali 2025)

काही ठिकाणी २० ऑक्टोबर सोमवार तर काही ठिकाणी २१ ऑक्टोबर मंगळवारी दिवाळी साजरी केली जाणाक आहेत. त्यामुळे सुट्ट्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ज्या राज्यात दिवाळी २१ ऑक्टोबर म्हणजे सोमवारी साजरी केली जाणार आहे तिथे त्या दिवशी सुट्टी असणार आहे. तर ज्या राज्यात मंगळवारी साजरी केली जाणार आहे तिथे सुट्ट्या असणार आहे.

२० ऑक्टोबर सोमवारी त्रिपुरा, गुजरात, मिझोराम, कर्नाटक, मध्य प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू, उत्तराखंड, आसामा, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, पश्चित बंगाल, गोवा, छत्तीसगड, मेघालय, हिमाचल प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेशातील बँका बंद असणार आहेत.

मंगळवारी २१ ऑक्टोबर रोजी ओडिशा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बँका बंद असणार आहेत.

२२ ऑक्टोबर २०२५ रोजी नववर्ष, बल प्रतिपदा, दिवाळी, गोवर्धन पूजानिमित्त गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड येथे बँका बंद असणार आहेत.

गुरुवारी २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीज, चित्रगुप्त जयंतीनिमित्त गुजरात, सिक्कीम, मणिपुर, उत्तर प्रदेश, पश्चित बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद असणार आहे.

२७ आणि २८ ऑक्टोबर रोजी छठ पूजानिमित्त पश्चित बंगाल, बिहार आणि झारखंडमधील बँका बंद असणार आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त बँक बंद असणार आहेत.

ऑनलाइन सुविधा सुरु

सुट्टीच्या दिवशी बँका बंद असल्या तरीही ऑनलाइन सेवा सुरु असणार आहेत. एटीएम, मोबाईल अॅप आणि यूपीआयवरुन तुम्ही व्यव्हार करु शकतात. तुम्ही पैसे पाठवू शकतात, ऑनलाइन बिल भरु शकतात. जी कामे तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करु शकतात ती करण्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC elections : मी मोदींचा भक्त, मुंबईवर भाजपचं कमळ फुलणारच, महेश कोठारे काय म्हणाले?

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

SCROLL FOR NEXT