Bank Holidays  Saam Tv
बिझनेस

Bank Holiday Today: मोठी बातमी! आज देशातील बँका बंद; कारण काय?

Bank Holiday Today 27th January 2026: देशातील अनेक बँका आज बंद असणार आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संप केला आहे. त्यामुळेच बँकेचे अनेक कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Siddhi Hande

आज देशातील अनेक बँका बंद

बँकेत काही काम असेल तर आधी चेक करा

बँक कर्मचाऱ्यांचा आज संप

आज २७ जानेवारी रोजी देशातील बँका बंद असणार आहे. आज बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संप करणार आहे. बँक कर्मचारी युनियनचा संप असणार आहे. त्यामुळे बँकेचे अनेक कर्मचारी या संपात सहभागी होणार आहे. त्यात पार्श्वभूमीवर बँका आज बंद राहणार की सुरु राहणार आहेत याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, आज बँकांना सुट्टी नाहीये. रिझर्व्ह बँक दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करतात. यानुसार आज राज्यातील बँकांना सुट्टी नाहीये.परंतु बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक सेवांवर परिणाम होऊ शकतो.

२७ जानेवारी म्हणजे आज जर तुम्ही बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या बँकेची शाखा सुरु आहे की नाही हे चेक करा. देशातील अनेक भागातील बँका आज बंद असणार आहे. त्यामुळे आज तुमचे काम होण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने आज २७ जानेवारीला कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

या बँका राहणार बंद (Bank Holiday Today)

देशभरात बँक कर्मचाऱ्यांचा संप असणार आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, नॅशनल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँकेचा समावेश आहे. काही शहरातील बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलन करणार आहे. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्या तर आंदोलन अजून तीव्र होईल, असं सांगितलं जात आहे.

काय आहे कारण?

बँक युनियनची मागणी आहे की, बँकेच्या कर्मचाऱ्यांना ५ दिन वीक करावा. म्हणजेच शनिवार-रविवारी सुट्टी मिळावी. सध्या बँकांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी आहे. त्यामळे ही मागणी केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारकडे हा प्रस्ताव देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lapwing Bird: टिटव्या रात्री का ओरडतात? काय असतात संकेत? जाणून घ्या सत्य

गणेश नाईकांनी शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललाय; शिंदेंच्या खास माणसाचं भाजपला पत्र, महायुतीत वादाची ठिणगी

Maharashtra Live News Update: मुंब्रात आज जितेंद्र आव्हाडांचा नागरी सत्कार, बाईक रॅलीकाढून शक्तिप्रदर्शन

Eyebrow Growth: सुंदर लांब अन् दाट भुवया वाढवायच्या आहेत? मग सोप्या स्टेप्स करा फॉलो

Valentine Day Love Letter: तुझी अन् तुझीच प्रेम वेडी, पण आपल्या प्रेमाला जात, समाजाच्या स्टेट्सची बेडी

SCROLL FOR NEXT