Gig Workers Protest News
Gig Workers Protest News

Gig Workers : १० मिनिटांची डिलिव्हरी बंद करा! गिग वर्कर्सचा देशव्यापी संप, स्विगी, झोमॅटो अन् झेप्टोवर परिणाम

Gig Workers Protest News : ३१ डिसेंबर रोजी गिग वर्कर्स देशव्यापी संपावर जाणार असून स्विगी, झोमॅटो, झेप्टोसह ऑनलाइन डिलिव्हरी सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Published on

Nationwide gig workers strike on December 31 : थर्टीफर्स्टचा प्लान केलाय? सरत्या वर्षाला निरोप देताना अन् नव्या वर्षाचे स्वागत करताना तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करण्याचा विचार करत असाल तर आताच प्लान बदला. कारण, ३१ डिसेंबर रोजी फूड डिलिव्हरी आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्ससाठी ऑनलाइन डिलिव्हरीचे काम करणाऱ्या 'गिग वर्कर्स'नी देशव्यापी संपाचा इशारा दिलाय. त्यामुळे ऐनवेळी तुमची धावपळ होऊ शकते. ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाचा निर्णय घेतलाय, त्यासाठी त्यांनी ३१ डिसेंबर २०२५ हा दिवस निवडलाय. या संपाचा परिणाम मेट्रो शहरांसह प्रमुख शहरांवर होण्याची शक्यता आहे.

३१ डिसेंबर २०१५ रोजी गिग वर्कर्स संपावर जाणार आहेत, त्यामुळे वर्षाअखेर ऑनलाइन सेवांवर परिणाम होणार आहे. तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स यूनियन (TGPWU) इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्सने (IFAT) बुधवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. कामाची खालावलेली स्थिती, कमी होत जाणारी कमाई आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव या विरुद्ध संपाचा इशारा दिलाय. स्विगी, झोमॅटो अन् झोप्टोसह इतर ठिकाणी काम करणारे कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी ऑनलाइन सेवा पूर्णपणे विस्कळीत अथवा ठप्प होऊ शकतात.

Gig Workers Protest News
Election : निवडणूक लढवायची मग ५०० शब्दात निबंध लिहा, अन्यथा..., आयोगाचा नवा नियम काय?

'गिग वर्कर्स'नी संपाची हाक का दिली?

TGPWU आणि IFAT या संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. सण-उत्सव आणि मागणीच्या काळात डिलिव्हरी कामगार हे कणा असतात. पण त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. पण त्यांची कमाई खूपच कमी आहे. कामाचे तास जास्त आहेत, त्याप्रमाणात कर्मचाऱ्यांना मोबदला मिळत नाही. अनेकदा डिलिव्हरी ठिकाणे असुरक्षित असतात. गिग वर्कर्ससोबत काही ठिकाणी वागणूक चांगली मिळत नाही. त्यांच्या मूलभूत सेवांकडे कुणीही लक्ष देत नाही, त्यामुळेच हा संप पुकारण्यात येत असल्याचे संघटांनी आपल्या निवेदनात म्हटलेय.

Gig Workers Protest News
Bharat Gogawale : मंत्र्याच्या मुलाच्या अडचणी वाढल्या, अटकपूर्व जामीन ३ वेळा फेटाळला, राऊत म्हणाले शिंदेसेनेचा नेता फरार

१० मिनिटांच्या सेवांना विरोध -

कामगारांचे कामाचे तास आणि काम याचा विचार करण्यात यावा. त्याशिवाय १० मिनिटांत ऑनलाइन डिलिव्हरी सेवा बंद करण्याची मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे. कारण, यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात येते. अपघात विमा आणि सुरक्षा उपकरणे सुधारावीत. त्याशिवाय अनिवार्य विश्रांतीसाठी वेळ द्यावा, असेही संघटनांनी आपल्या निवेदनात म्हटलेय.

Gig Workers Protest News
Heart Attack in Winter : हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळे हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकचा धोका, या शहरात १०० जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com