17th October Bank Holiday saam tv
बिझनेस

17th October Bank Holiday: शनिवारी बँक सुरू राहणार की बंद? RBI कडून मोठी अपडेट, ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

RBI Holiday List : नवरात्री सुरू झाली असून आजचा सहावा दिवस आहेत. या दिवसांमध्ये बँका सुरूच होत्या. पण १७ ऑक्टोबरला बँका सुरू असणार की नाही याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Sakshi Sunil Jadhav

तुम्ही १७ ऑक्टोबरला बँकेत कामानिमित्त जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. उद्या, शनिवार १७ ऑक्टोबर २०२६ रोजी देशातल्या बऱ्याच शहरांमध्ये बँका सुरू राहणार आहेत. पण त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे महा सप्तमीच्या निमित्ताना बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे बँकेत जाण्याआधी आपल्या शहरातल्या सुट्टीची माहिती तपासून घेणं महत्त्वाचं आहे.

१७ ऑक्टोबरला बँका कठे सुरू, कुठे बंद?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या ऑक्टोबर २०२६ च्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, १७ ऑक्टोबर हा महिन्याचा तिसरा शनिवार आहे. त्यामुळे फक्त बँका बंद राहणार नाहीत. महाराष्ट्रातही बँक सुरूच असणार आहेत. तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना नियमित सुट्टी असेल. पण अगरतळा येथे महा सप्तमीनिमित्त बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत. इतर शहरांमध्ये स्थानिक सण किंवा सुट्टी लागू आहे का, हे संबंधित बँकेच्या अधिकृत सूचनेतून तपासणं महत्त्वाचं आहे.

बँका बंद असल्या तरी डिजिटल सेवा सुरू

बँकेची शाखा बंद असली, तरी अनेक डिजिटल बँकिंग सेवा सुरू राहतील. ग्राहकांना पुढच्या सेवांचा वापर करता येईल.

UPI: ऑनलाइन पैसे पाठवणे आणि स्वीकारणे.

IMPS: त्वरित पैसे हस्तांतरित करणे.

NEFT आणि RTGS: बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करणे.

ATM: रोख रक्कम काढणे, उपलब्धतेनुसार.

मोबाइल आणि इंटरनेट बँकिंग: शिल्लक तपासणे, व्यवहार करणे आणि इतर ऑनलाइन सेवा वापरणे.

मात्र, चेक क्लिअरन्स, बँकेतल्या प्रत्यक्ष रोख व्यवहार, KYC अपडेट आणि लॉकरसारख्या सेवांसाठी शाखा सुरू असणं आवश्यक असू शकतं.

पुढच्या आठवड्यातही बँकांना सुट्ट्या

दुर्गापूजा आणि दसऱ्याच्या निमित्ताने ऑक्टोबरच्या पुढच्या आठवड्यात काही शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. १९ ऑक्टोबर रोजी अगरतळा, कोलकाचा, चेन्नई, भुवनेश्वर, गुवाहाटी, पाटणा आणि इतर काही शहरांमध्ये सुट्टी आहे. २० ऑक्टोबर रोजीही अनेक शहरांमध्ये दसऱ्यानिमित्त बँका राहतील. २१ ऑक्टोबर रोजी काही निवडक शहरांमध्ये सुट्टी असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shevayachi Kheer Recipe: यंदाचा दसरा करा खास, घरी बनवा पारंपरिक आणि चविष्ट शेवयांची खीर, वाचा खास रेसिपी

Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? सरन्यायाधीशांवरील वक्तव्य भोवले; राऊतांनी मागितली माफी, म्हणाले...

Diabetes Control Food: डायबिटिजचा धोका कमी करतात 'हे' पदार्थ, शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा

Maharashtra News Live Update: राज्यभरात 'आपले सरकार' पोर्टलसह ऑनलाइन सेवा २१ ऑक्टोबरपर्यंत बंद

Pune News: ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, २२ वर्षीय इंजिनिअरचा घाबरून मृत्यू; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT