Reactivate Bank Account Saam tv
बिझनेस

Reactivate Bank Account : बंद झालेले बँक खाते पुन्हा सुरु करता येणार, RBI चा नियम पाहा अन् प्रोसेस करा

RBI New Rules : RBI च्या मतानुसार बंद झालेली खाते पुन्हा उघडण्यासाठी ग्राहकांना केवायसी सबमिट करावा लागणार आहे. हा केवायसी बँकेच्या कोणत्याही शाखेत सबमिट करता येईल. ही प्रक्रिया ग्राहकांना व्हिडिओद्वारे देखील प्रक्रिया पूर्ण करता येईल.

कोमल दामुद्रे

Reactivation Of Dormant Accounts

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने बंद झालेल्या बँक खात्यांना पुन्हा सुरु करण्यासाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. तर ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी नियमही कडक केले आहे.

RBI च्या मतानुसार बंद झालेली खाते पुन्हा उघडण्यासाठी ग्राहकांना केवायसी सबमिट करावा लागणार आहे. हा केवायसी बँकेच्या (Bank) कोणत्याही शाखेत सबमिट करता येईल. ही प्रक्रिया ग्राहकांना व्हिडिओद्वारे देखील प्रक्रिया पूर्ण करता येईल.

बंद झालेले बँक खाते (Account) पुन्हा सुरु करण्यासाठी बँका कोणतेही शुल्क आकारणार नाही. खाते पुन्हा सुरु झाल्यास बँका किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड आकारु शकत नाही. जर तुमचे बंद झालेले खाते पुन्हा सुरु केले तर बँकेला ग्राहकांना व्याजदरही द्यावा लागेल.

इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, आरबीआयने बँकांना बंद झालेल्या बँक खात्यांची ओळख करण्यासाठी वर्षभरात पुनरावलोकन करण्याचे आदेश दिले आहेत.

1. RBI चा नियम काय?

आरबीआयने नियमात म्हटले आहे की, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी बंद झालेली खाते शोधण अधिक गरजेचे आहे. बंद झालेली खाते पुन्हा सुरु झाल्यानंतर ग्राहकांना किमान सहा महिने व्यवहार करावा लागेल तसेच त्यावर आरबीआयची कडक नजर असणार आहे. त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही.

आरबीआयचा हा नियम १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे. यामध्ये छोट्या बँकेपासून मोठ्या बँकेपर्यंत सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यामध्ये बँकेने ग्राहकांच्या मुदत ठेवीकडे लक्ष द्यावे असे आरबीआयने म्हटले आहे. जर खाते पुन्हा सुरु केल्यानंतर ग्राहकाने रक्कम काढली किंवा टाकली नाही, त्या खात्यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला नाही तर बँकांना त्याबाबतची माहिती द्यावी लागेल. जर खातेदाराचा मृत्यू झाला असेल त्याचा नॉमिनी शोधणे देखील बँकांचे काम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT