Neena Gupta: नीना गुप्ता वयाच्या ६६ व्या वर्षी प्रग्नेंट? अभिनेत्री म्हणाली, 'मला मनापासून आनंद...'

Neena Gupta: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्नाच्या रिसेप्शनपासून ६६ वर्षीय नीना गुप्ता यांच्या प्रग्नेंसीबद्दल अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत. यावर त्या अभिनेत्रीने अत्यंत विनोदी स्टाईलमध्ये स्पष्टीकरण दिले आहे.
 Neena Gupta
Neena GuptaSaam Tv
Published On

Neena Gupta: नीना गुप्ता प्रग्नेंट आहेत का? आणि तेही वयाच्या ६६ व्या वर्षी? सोशल मीडियावर हे प्रश्नांचा मोठ्या प्रमाणात विचारले जात आहेत. नीना यांच्या साडीतील एका लूकने नेटकऱ्यांना पूर्णपणे अवाक करून सोडले. या अफवेची चर्चा अखेर नीना यांच्यापर्यंतही पोहोचली आणि ती ऐकून त्यांनी मिश्किलपणे त्या प्रेग्नेंट नसल्याचे सांगितले.

नीना गरोदर आहेत का?

नीना यांनी स्पष्टपणे सांगितले की, वयाच्या ६६ व्या वर्षी त्या नक्कीच बाळाची अपेक्षा करत नाहीत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांवर आपल्या खास विनोदी शैलीत प्रतिक्रिया देताना, त्यांनी बॉलिवूड हंगामाला सांगितले, "आता फक्त हेच बाकी राहिले होते की माझ्या आयुष्यात 'बधाई हो' सारखा एक क्षणच यावा.'

 Neena Gupta
Amitabh Bachchan: 'एक-एक करून सगळे...'; अमिताभ बच्चन यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन

नीना यांनी पुढे सांगितले, पण, असे काही नाही. मी प्रेग्नेंट नाही. हा पण विजय आणि रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये मी जी साडी नेसले होते, तिचे कापड थोडे जाड होते; म्हणूनच मी नेहमीपेक्षा थोडी अधिक जाडसर दिसत होते. त्यामुळेच या अफवांना सुरवात झाली.

त्यानंतर त्या हसत-हसत म्हणाल्या, "तरीही, मला मनापासून आनंद वाटतो की, माझ्या या वयातही लोक मी प्रेग्नेंट होऊ शकते या शक्यतेवर चर्चा करत आहेत. यावरून हेच ​​सिद्ध होते की, आपला समाज खरोखरच बदलत आहे."

 Neena Gupta
Monalisa Wedding Controversy: महाकुंभ गर्ल मोनालिसाच्या लग्नानंतर मोठा वाद, लव्ह जिहादच्या आरोपांना नवरा म्हणाला, 'ती तिच्या धर्मात…'

गरोदरपणाच्या अफवा कशा सुरू झाल्या?

नीना यांच्या गरोदरपणाबद्दलच्या चर्चांना तेव्हा सुरुवात हैदराबादमध्ये विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावली तेव्हापासून झाली. त्यांनी पापाराझींसमोर फोटो काढले. यावेळी त्यांनी ivory साडी आणि त्याला साजेसा 'हॉल्टर-नेक' ब्लाउज परिधान केला होता. त्यानंतर या लूकचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हा काही नेटकऱ्यांनी असा दावा करण्यास सुरुवात केली की, त्या प्रेग्नेंट आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com