आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर हल्ली सगळेच जण करतात. बरेचदा प्रवास असताना आपण गाणी किंवा इंटरनेटवर काही पाहात असताना नेट स्लो होतो. असे का होते? याचे कारण काय?
1. नेटवर्क सेटिंग्ज
आपण फोनच्या (Phone) नेटवर्क सेटिंग्ज तपासायल्या हव्या. तुमच्या फोनमध्ये योग्य नेटवर्क ऑपरेटरचे सिम कार्ड असल्याची खात्री करा. तुमचा फोन 4G सपोर्टर आहे की, 5G हे देखील तपासा
2. डेटा ऑटो-अपडेट
तुमच्या फोनमध्ये डेटा ऑटो-अपडेट सुरु असल्यास नेट स्लो होऊ शकतो. त्यासाठी फोनच्या सेटिंग्जवर जा आणि डेटा ऑटो अपडेट बंद करा.
3. बँकग्राउंड अॅप्स
बरेचदा फोनमध्ये बँकग्राउंड अॅप्स सुरु असतात. त्यामुळे देखील तुमचा इंटरनेट स्पीड कमी होऊ शकतो. त्यासाठी बँकग्राउंड अॅप्स बंद करा.
4. कॅशे आणि डेटा
फोनमधील कॅशे आणि डेटा महिन्यातून एकदा क्लिन करा. त्यामुळे इंटरनेट स्पीड देखील फास्ट होईल. असे करुनही तुमचा इंटरनेट स्पीड स्लो होत असेल तर फोन रीस्टार्ट करा.
5. WIFI सेटिंग्ज
तुम्ही वाय-फाय वापरत असाल तर पासवर्ड एकदा चेक करा. तसेच तुमचा राउटर चालू आहे का याची खात्री देखील करा.
6. या गोष्टींची काळजी घ्या
फोनमध्ये वारंवार सॉफ्टेवर अपडेट्स आणि इन्स्टॉल करा. त्यामुळे इंटरनेट स्पीड सुधारू शकतो.
फोन मेमरी क्लिअर ठेवल्याने त्याचा स्पीड सुधारू शकतो. तसेच फोनमध्ये मेमरी वाढवणाऱ्या फाईल्स किंवा अॅप्स डिलिट करा.
आपण फोन तासंतास वापरतो ज्यामुळे तो गरम होतो. त्यामुळे देखील इंटरनेटचा स्पीड स्लो होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.