लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक हल्ली सगळेच वापरतात. आपल्या जवळच्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींना आपल्या अधिक जवळ आणण्यासाठी आपण दिवसभर याचा वापर करतो. फेसबुकचे फेम काही वर्षांपूर्वीच अधिक होते. स्टेटसपासून ते तुम्ही कोणत्या ठिकाणी काय करत आहोत. यासारख्या गोष्टी आपण सहज तिथे अपलोड करतो.
अशातच या प्लॅटफॉर्मवरुन जर तुम्हाला अनोळखी व्यक्तीने रिक्वेस्ट पाठवली आणि तुम्ही ती अॅक्सेप्ट केली तर तुम्हाला महागात पडू शकते. तुम्ही ज्या व्यक्तीला स्वत:ला ओळखीचे समजून फेसबुक (Facebook) फ्रेंड बनवले त्याची आयडी खरी आहे का? आयडी बनावट निघण्याची शक्यता देखील आहे. अशावेळी फसवणूक (Fraud) करणारे आयडी तयार करुन वापरकर्त्यांची फसवणूक करतात. याला तुम्ही बळी पडू शकता.
अशावेळी फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला येणारी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी त्याबाबत नीट चौकशी करा. बनावट आयडी स्कॅम (Scam) टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या अकाउंटला लॉक करावे लागले. तसेच तुमचा वैयक्तिक डेटा कोणालाही शेअर करु नका. सायबर सिक्युरिटी ब्युरोने सोशल मीडिया स्कॅम्सविरोधात युजर्सला अलर्ट दिला जातो.
1. या गोष्टी लक्षात ठेवा
फेसबुकवर कोणालाही मित्र बनवणे ही गोष्ट सामान्य असली तरी त्यामुळे नुकसान होऊ शकते.
फेसबुकवर आपली संपूर्ण माहिती ही पब्लिक स्वरुपात मिळते. याचा अर्थ असा की, कोणतीही व्यक्ती तुमच्याबद्दल सहज माहिती काढू शकते.
अनोळखी व्यक्तीशी मैत्री केल्यास तुम्हाला स्पॅम आणि फ्रॉड लिंक पाठवून तुमचा फोन किंवा लॅपटॉप हॅक केला जाऊ शकतो.
फेसबुकवर असे अनेक लोक असतात जे असतात वेगळे आणि जगासमोर स्वत:ची इमेज वेगळी बनवतात. अशा लोकांशी मैत्री केल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
फेसबुकवर कुणालाही मित्र बनवण्यापूर्वी त्याचे प्रोफाइल नीट काळजीपूर्वक तपासा. त्याच्या पोस्ट किंवा कमेंट्स देखील पाहा. तुमच्या फ्रेंड लिस्टमधील किती लोकांचे फ्रेंड आहे हे देखील तपासा
2. फसवणूक झाल्यास तक्रार कुठे कराल?
जर तुमच्यासोबत फ्रॉड झाला असेल तर तक्रार करण्यासाठी तुम्हाला १९३० या क्रमांकावर डायल करा. याशिवाय तुम्ही http://cybercrime.gov.in वर देखील तक्रार करु शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.