Bank Account Fraud saam tv
बिझनेस

Bank Fraud : बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाले? घाबरू नका! RBI च्या नियमांनुसार मिळू शकतो पूर्ण रिफंड

RBI Refund Rules : बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाल्यावर घाबरू नका. RBI च्या नियमांनुसार तक्रार केल्याने पात्र प्रकरणांमध्ये पैसे परत मिळू शकतात.

Sakshi Sunil Jadhav

आजकाल ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे बँक खात्यातून पैसे चोरीला जाण्याच्या घटनाही समोर येत आहेत. अनेकदा ग्राहकांच्या परवानगीशिवाय खात्यातून पैसे काढले जातात. अशावेळी नेमकं काय करायचं, पैसे परत कसे मिळवायचे आणि नुकसान कोण भरून देणार, असे प्रश्न पडतात. मात्र, अशा फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ग्राहकांसाठी काही महत्त्वाचे नियम केले आहेत.

पैसे गायब झाल्यास सर्वात आधी काय कराल?

१. तातडीने बँकेला कळवा: खात्यातून अनधिकृत पैसे कट झाल्याचे लक्षात येताच बँकेच्या अधिकृत कस्टमर केअर नंबरवर किंवा मोबाइल अॅपवर तक्रार करा. गरज असल्यास खाते फ्रीज करण्यास किंवा डेबिट व्यवहार बंद करण्यास सांगा.

२. तक्रारीचा नंबर जपून ठेवा: बँकेकडून मिळालेला तक्रार क्रमांक, बँक स्टेटमेंट, व्यवहाराचे SMS आणि स्क्रीनशॉट पुरावा म्हणून सुरक्षित ठेवा.

३. १९३० हेल्पलाइनवर संपर्क करा: ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइनवर कॉल करा. तसेच cybercrime.gov.in या वेबसाइटवर तक्रार नोंदवा.

RBI च्या नियमानुसार पैसे परत कधी मिळतात?

RBI च्या नियमांनुसार, बँकेच्या निष्काळजीपणामुळे फसवणूक झाल्यास ग्राहकाची जबाबदारी शून्य असते. तसेच थर्ड पार्टीमुळे फसवणूक झाली आणि ग्राहकाने बँकेचा अलर्ट मिळाल्यानंतर तीन कामकाजाच्या दिवसांत तक्रार केली, तर ग्राहकाला शून्य आर्थिक जबाबदारी लागू होऊ शकते. चार ते सात कामकाजाच्या दिवसांत तक्रार केल्यास ग्राहकाची जबाबदारी खात्याच्या प्रकारानुसार मर्यादित असते. मात्र, OTP, PIN किंवा पासवर्ड स्वतः शेअर केल्यामुळे नुकसान झाल्यास तक्रार करण्यापूर्वीची जबाबदारी ग्राहकावर येऊ शकते.

किती दिवसांत मिळणार रिफंड?

RBI च्या नियमानुसार पात्र प्रकरणांमध्ये बँकेला तक्रार मिळाल्यानंतर १० कामकाजाच्या दिवसांत तात्पुरती रक्कम (Provisional Credit) जमा करावी लागते. तर अंतिम निर्णयासाठी साधारणपणे ९० दिवसांची मर्यादा आहे. त्यामुळे खात्यातून पैसे गायब झाल्यास उशीर न करता बँकेकडे तक्रार करा. वेळेत कारवाई केल्यास तुमचे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होऊ शकते. आजकाल ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत.

त्यामुळे बँक खात्यातून पैसे चोरीला जाण्याच्या घटनाही समोर येत आहेत. अनेकदा ग्राहकांच्या परवानगीशिवाय खात्यातून पैसे काढले जातात. अशावेळी नेमकं काय करायचं, पैसे परत कसे मिळवायचे आणि नुकसान कोण भरून देणार, असे प्रश्न पडतात. मात्र, अशा फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ग्राहकांसाठी काही महत्त्वाचे नियम केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: मोठी बातमी! २ आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सातपुड्यातील सर्वात उंच शिखरावर होणाऱ्या अस्तंबा यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Rahul Gandhi : निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीचा 'महामोर्चा', नजर फिरेल तिथपर्यंत आंदोलक, पाहा व्हिडीओ

Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण सुरुवात कशी करणार? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोप्या टिप्स

Fact Check : महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांना ९००० रुपये मिळणार, सुनेत्रा पवारांच्या नावाने मेसेज व्हायरल, सत्य आलं समोर

SCROLL FOR NEXT