Gold Price Today: १० दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे ताजे दर पाहा

Gold and Silver Prices : गेल्या १० दिवसांत सोन्याच्या दरात ५,८४० रुपयांची तर चांदीच्या दरात किलोमागे २५ हजार रुपयांची घसरण झाली आहे.
Gold Price Today
Gold Price TodaySaam Tv
Published On: 

सोनं-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या १० दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे तब्बल ५,८४० रुपयांनी कमी झालाय. तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात ५,०५० रुपयांची घसरण झाली. दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळाली असून, किलोमागे तब्बल २५ हजार रुपये कमी झाले आहेत. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं लक्ष आजच्या बाजारभावाकडे लागलं आहे.

१० दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण

दिलेल्या दरांच्या माहितीनुसार, गेल्या १० दिवसांत सोन्याच्या बाजारात चढ-उतार पाहायला मिळालाय. २४ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नाही. तर २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान सोन्याच्या किमतीत वाढ झाली होती. मात्र, इतर दिवशी झालेल्या घसरणीमुळे २४ कॅरेट सोनं ५,८४० रुपयांनी, तर २२ कॅरेट सोनं ५,०५० रुपयांनी स्वस्त झालं.

Gold Price Today
8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! वाढीव पगार आणि पेन्शन कधी खात्यात येणार? वाचा अपडेट्स

प्रमुख शहरांतील सोन्याचे आजचे दर

मुंबईतील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट - १,३८,८८०

२२ कॅरेट - १,२७,३००

१८ कॅरेट - १,०४,१६०

Gold Price Today
NAFSCOB च्या संचालकपदी ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ विद्याधर अनास्कर बिनविरोध

दिल्लीतील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट - १,३९,०३०

२२ कॅरेट - १,२७,४५०

१८ कॅरेट - १,०४,३१०

कोलकातातील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट - १,३८,८८०

२२ कॅरेट - १,२७,३००

१८ कॅरेट - १,०४,१६०

चेन्नईतील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट - १,३८,८८०

२२ कॅरेट - १,२७,३००

१८ कॅरेट - १,०४,१६०

बंगळुरूमधील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट - १,३८,८८०

२२ कॅरेट - १,२७,३००

१८ कॅरेट - १,०४,१६०

हैदराबाद मधील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट - १,३८,८८०

२२ कॅरेट - १,२७,३००

१८ कॅरेट - १,०४,१६०

चांदीच्या दरात किलोमागे ₹२५ हजारांची घसरण

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. गेल्या १० दिवसांत एक किलो चांदीचा भाव तब्बल २५ हजार रुपयांनी कमी झाला आहे. २३ ऑक्टोबर रोजी चांदीच्या दरात ५ हजार रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर पाच दिवस दर स्थिर राहिले. मात्र २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान सलग तीन दिवसांत चांदीचे भाव आणखी २० हजार रुपयांनी खाली आले. सध्या दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमध्ये एक किलो चांदीचा भाव २ लाख रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.