PM Ayushman Bharat SaamTv
बिझनेस

PM Ayushman Bharat: ७० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार; पीएम मोदींनी दिले आयुष्मान कार्ड

PM Ayushman Card For 70 above Age Group: केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आता ७० वर्षांवरील नागरिकांनाही लाभ मिळणार आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वयोवृद्ध नागरिकांना आयुष्मान कार्डचे वाटप केले आहे.

Siddhi Hande

भारत सरकारने पीएम आयुष्मान भारत योजना राबवली आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. याआधी केवळ ६५ वयापर्यंतच्या लोकांना ५ लाखांपर्यंत उपचार मिळत होते. परंतु सध्या ७० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांनाही ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्लीत एका कार्यक्रमात आयुष्मान वय वंदन कार्ड लाभार्थींना दिले.

आयु्ष्मान भारत योजनेत १२८५० कोटी लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.या नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड देण्यात आले आहे. दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (Ayushman Bharat Yojana)

या योजनेअंतर्गत आता ७० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांनादेखील हेल्थ कवरेज मिळणार आहे. त्यामुळे देशातील तब्बल ४.५ कोटी कुटुंबातील ६ कोटी वयोवृद्ध नागरिकांना लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत कमी उत्पन्न असलेल्या लोकांना लाभ मिळणार आहे.

वयोवृद्ध नागरिकांना टॉप अप मिळणार

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ७० वर्षांवरील नागरिकांना लाभ घ्यायचा असेल तर ई-केवायसी पूर्ण करावे लागेल. ई केवायसी पूर्ण केल्यानंतर वयोवृद्ध नागरिकांना प्रत्येक वर्षाला ५ लाखांपर्यंत टॉप अप कवर मिळणार आहे. या योजनेअंतर्गत १२,६९६ खाजगी हॉस्पिटलसह २९,६४८ हॉस्पिटलमध्ये तुम्ही उपचार घेऊ शकतात. (Ayushman Card)

आधार कार्डद्वारे वय निश्चित केले जाणार

या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या नागरिकांना आधार कार्डवरील वयानुसार लाभ मिळणार आहे. पात्र वरिष्ठ नागरिकांना रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्याचसोबत ई-केवायसी करावे लागणार आहे. जर तुम्ही इतर प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स घेत असाल तरीही तुम्ही आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात.योजनेअंतर्गत आता ७० वर्षांवरील नागरिकांनाही ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: मतमोजणीच्या नियमात बदल, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय

Sambhaji Bhide: दांडिया खेळणं म्हणजे नपुंसकता; संभाजी भिडेंच्या वक्तव्याने महाराष्ट्रात पेटला वाद

Rahul Gandhi : तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्या सोबत; मामा पगारेंना थेट राहुल गांधींचा फोन, VIDEO

Farmers in Marathwada: आभाळाचं क्रूर रूप! अतिवृष्टीने पिकं आणि आशा दोन्ही वाहून घेतली,बळीराज्याने फोडला टाहो

Helmet: तुमचं हेल्मेट एक्सपायर झालंय? कसं ओळखाल?

SCROLL FOR NEXT