Ayushman Bharat: आयुष्मान भारत कार्ड हरवलंय? टेन्शन घेऊ नका, ही सोपी प्रोसेस करा मोफत उपचार होईल

Ayushman Bharat Card: आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. या योजनेत आयुष्मान भारत कार्ड बनवले जाते.
Ayushman Bharat Yojana
Ayushman Bharat YojanaSaam Tv
Published On

निरोगी आरोग्य हे प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचे आहे. जर आपले आरोग्य निरोगी असेल तर सर्वकाही करु शकतो. परंतु सध्याच्या काळात कधी कोणाला काय होईल या भरवसा नाही. अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. या काळात आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे देशात आयुष्मान भारत योजना राबवण्यात आली आहे.

अनेकदा कोणालाही आजार होऊ शकतात. या आजारासाठी खर्च करणे हे प्रत्येक व्यक्तीला शक्य होत नाही. परंतु अनेक लोक हेल्थ इन्शुरन्स घेतात. परंतु सर्वांनाच हे इन्शुरन्स घेणे शक्य होत नाही. अशाच लोकांना सरकारकडून मदत केली जाते. परंतु अनेकदा आयुष्मान भारत कार्ड हरवले जाते. जर तुमचे आयुष्मान कार्ड हरवले तरीही तुम्ही हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार घेऊ शकतात.

Ayushman Bharat Yojana
Post Office Scheme: नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, फक्त व्याजातूनच मिळणार २ लाख रुपये; जाणून घ्या कसे?

आयुष्मान भारत योजनेत प्रत्येक गरीब व्यक्तीचे उपचारासाठी मोफत केले जातात. आयुष्मान भार योजनेअंतर्गत ५ लाखांपर्यंत मोफत इलाज केला जातो. या योजनेत आयुष्मान भारत कार्ड देण्यात आले आहे. या कार्डावर तुम्ही दिलेल्या काही ठरावीक हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार दिले जातात.

आयुष्मान योजनेअंतर्गत तुम्हाला कार्ड दिले जाते. हे कार्ड तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखवले तर तुम्हाला मोफत उपचार दिला जातो. जर तुमचे आयुष्मान भारत कार्ड हरवले तरीही तुम्ही उपचार घेऊ शकतात. तुम्हाला फक्त हॉस्पिटलमध्ये तुमच्या आयुष्मान कार्डचा रजिस्टर नंबर सांगावा लागेल. त्यानंतर आयुष्मान भारत योजनेत वेरिफिकेशन केले जाईल आणि तुमचा उपचार मोफत केला जाईल. (What If I Lost Ayushman Card Do these things)

Ayushman Bharat Yojana
PPF Scheme: कामाची बातमी! दररोज फक्त २०४ रुपये गुंतवा अन् करोडपती व्हा

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आता ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांनाही लाभ घेता येणार आहे. याआधी फक्त ७० वर्षांपर्यंतच्या लोकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळत होते.आता ही वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अपघातात जखमी किंवा आजार असल्यास मोफत उपचार मिळतात.(Ayushman Card)

Ayushman Bharat Yojana
New Internship Scheme: लाडक्या बहिणीनंतर आता भावांचा नंबर, तरुणांना दर महिन्याला मिळणार ५००० रुपये; जाणून घ्या कसे?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com