luxury car Saam tv
बिझनेस

Luxury Car : बाजारात धुमाकूळ घालणार 'ही' लक्झरी कार; देण्यात आले आहेत हटके फीचर्स, जाणून घ्या किंमत

luxury car features : बाजारात धुमाकूळ घालणारी लक्झरी कार आली आहे. या कारला हटके फीचर्स आहेत.

Vishal Gangurde

तुम्‍हाला लक्‍झरी एसयूव्‍ही खरेदी करायची असेल तर ऑडी क्‍यू३ सर्वोत्तम कार आहे. या कारमध्‍ये स्‍पोर्टी डिझाइन, उच्‍चस्‍तरीय वैशिष्‍ट्ये, दैनंदिन व्‍यावहारिकता आणि विश्‍वसनीय ऑडी इंजीनिअरिंगचे परिपूर्ण संयोजन आहे. ही कार प्रीमियम, प्रीमियम प्‍लस व टेक्‍नॉलॉजी व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये ऑफर करण्‍यात आली आहे आणि किंमत ४४,९९,००० रूपयांपासून (एक्‍स-शोरूम) सुरू होते.

क्‍यू३ एण्‍ट्री-लेव्‍हल लक्‍झरी एसयूव्‍हीपेक्षा अधिक असण्‍यामागील कारणे काय?

१. डायनॅमिक डिझाइन

क्‍यू३ चे आकर्षक स्‍टायलिंग लक्ष वेधून घेते. या कारमध्ये आकर्षक अष्‍टकोनी सिंगलफ्रेम ग्रिल, शार्प एलईडी हेडलॅम्‍प्‍स, पॅनोरॅमिक ग्‍लास सनरूफ आणि हाय ग्‍लॉस स्‍टायलिंग पॅकेज आहे. ही कार पाच आकर्षक एक्‍स्‍टीरिअर रंगांमध्‍ये शक्तिशाली आणि आकर्षक दिसते. तसेच नवेरा ब्‍ल्‍यू आणि पल्‍स ऑरेंज या रंगांमध्‍ये देखील कार येते. ही कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही आहे.

२. दर्जात्‍मक कार्यक्षमता

क्‍यू३ ची खासियत म्‍हणजे २.० लीटर टीएफएसआय पेट्रोल इंजिन, जे १९० एचपी शक्‍ती आणि ३२० एनएम टॉर्कची निर्मिती करते. तसेच कार फक्‍त ७.३ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्‍त करते. क्‍वॉट्रो ऑल-व्‍हील ड्राइव्‍हसह सर्व प्रकारच्‍या रस्‍त्‍यांवर घर्षण, स्थिरता आणि गतीशीलता मिळते. तसेच, ऑडी ड्राइव्‍ह सिलेक्‍टसह मूड आणि प्रदेशानुसार विविध ड्राइव्‍ह मोड्समधून निवड करू शकता.

३. तंत्रज्ञानाने युक्‍त इंटीरिअर

ऑडी क्‍यू३ च्‍या आतील बाजूस अत्‍याधुनिक तंत्रज्ञान आहे. ड्राइव्‍हरला ऑडी व्‍हर्च्‍युअल कॉकपीट प्‍लस आणि एमएमआय नेव्हिगेशन प्‍लससह एमएमआय टचच्‍या माध्‍यमातून पूर्णत: डिजिटल अनुभव मिळतो. तसेच आकर्षक व्हिज्‍युअल्‍स आणि सर्वोत्तम कंट्रोलची खात्री मिळते. केबिनला ३०-कलर अॅम्बियट लायटिंग पॅकेज, ऑडी फोन बॉक्‍ससह वायरलेस चार्जिंग आहे. त्याचबरोबर १०-स्‍पीकर ऑडी साऊंड सिस्‍टम अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह अधिक सुधारण्‍यात आले आहे.

४. व्‍यावहारिकतेसह प्रीमियम आरामदायीपणा

कॉम्‍पॅक्‍ट आकार असताना देखील क्‍यू३ मध्‍ये तिच्‍या सेगमेंटमधील सर्वात मोठी बूट क्षमता (५३० लीटर) आहे. तसेच पॉवर-अॅडजस्‍टेबल फ्रण्‍ट सीट्ससह लम्‍बर सपोर्ट आणि रिअल सीट्ससह फोअर/अॅफ्ट अॅडजस्‍टमेंट आहे. वीकेण्‍डला रोड ट्रिपवर जायचे असो किंवा दैनंदिन प्रवासावर जायचे असो. क्‍यू३ तुमच्‍या जीवनशैलीशी प्रभावीपणे जुळून जाते.

५. सुरक्षितता

सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. कारमध्‍ये सहा एअरबॅग्‍ज, ISOFIX चाइल्‍ड सीट माऊंट्स आणि सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. हिल स्‍टार्ट असिस्‍ट, पार्किंग एडसह रिअर-व्‍ह्यू कॅमेरा व टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्‍टम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

SCROLL FOR NEXT