Car Fire : गाडीत गॅस भरताना उडाला भडका; कारला भीषण आग, मोठी दुर्घटना टळली

Baramati News : पळसदेव गावात अनधिकृतरीत्या एलपीजी गॅस सिलिंडरमधून व्हॅनमध्ये गॅस भरला जात होता. याचवेळी अचानकपणे गॅस लिक झाला आणि आग लागली. वाहनाने पेट घेतला आणि आग नियंत्रणाबाहेर गेली
Car Fire
Car FireSaam tv
Published On

बारामती : अवैध गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गाड्यांमध्ये अवैधपणे गॅस भरला जात असतो. अशात गॅस लिकेज होऊन आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानुसार बारामतीमधील पळसदेवमध्ये ऐन उन्हाळ्यात ओमनी व्हॅनला आग लागली आहे. बेकायदेशीरपणे एलपीजी गॅस भरताना आग लागल्याची चर्चा असून सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 

पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावात ऐन उन्हाळ्यात ओमनी कारला आग लागल्याची घटना घडली आहे. मानवी लोकवस्तीत या कारला आग लागल्याने लोणी देवकर औद्योगिक वसाहतीतील आर्यन पप्स या कंपनीच्या मदतीने तात्काळ आग आटोक्यात आणण्यात आली. जर ही आग भडकली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

Car Fire
Hingoli Accident : भरधाव गाडीची बैलगाडीला धडक; शेतकऱ्यासह बैलाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली 
पळसदेव गावात अनधिकृतरीत्या एलपीजी गॅस सिलिंडरमधून व्हॅनमध्ये गॅस भरला जात होता. याचवेळी अचानकपणे गॅस लिक झाला आणि आग लागली. वाहनाने पेट घेतला आणि आग नियंत्रणाबाहेर गेली. आग लागल्याची घटना ज्या ठिकाणी घडली, त्या ठिकाणी मानवी लोकवस्ती आहे. कारला लागलेल्या आगीचा भडका उडाला असता तर ही आग भडकून मोठा अनर्थ घडला असता. मात्र सुदैवाने हि दुर्घटना टळली आहे. 

Car Fire
Kothurde Dam : कोथुर्डे धरणाने गाठला तळ; महाड शहरासह २२ गावांवर पाणीटंचाईची टांगती तलवार

गॅसचा अनधिकृत वापर वाढला  

दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली; याचं ठोस कारण समोर आलेले नाही. मात्र बेकायदेशीरपणे एका ओमनी व्हॅनमध्ये घरगुती वापराच्या एलपीजी टाकीमधून गॅस भरत असताना गॅसची गळती होऊन गाडीने पेट घेतल्याची चर्चा आहे. अर्थात या घटनेमुळे पुन्हा एकदा घरगुती गॅसचा अनधिकृत होत असलेला वापर समोर आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com