सचिन कदम
महाड (रायगड) : उन्हाची तीव्रता वाढत असताना धरण, तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार महाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणातील पाणीसाठा कमी होऊन धरणाने तळ गाठला आहे. यामुळे महाड शहरासह आजूबाजूच्या २२ गावांवर पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. पाणीसाठा आणखी कमी झाल्यास नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
उन्हाची वाढती तीव्रतेने राज्यातील अनेक भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून अनेक भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन धरणातील पाणीसाठा देखील झपाट्याने कमी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार महाडच्या कोथुर्डे धरणातील पाणीसाठ्यात देखील मोठी घट झाली असून धरणाने तळ गाठला आहे.
सध्या शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा
रायगडच्या महाड शहराला पाणीपुरठा होणाऱ्या कोथुर्डे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला असून एप्रिल महिना अर्धावर असतानाच कोथुर्डे धरणाचे पाणी तळाला गेले आहे. यामुळे महाड शहरासह २२ गावांवर पाणी टंचाईची टांगती तलवार लटकलेली दिसून येत आहे. कोथुर्डे धरणाचे पाणी तळाला गेल्याने महाड नगरपालिकेने कोथुर्डे धरणातील शिल्लक पाणी उपसण्यासाठी पंप लावले आहेत. हे शिल्लक पाणी पंपाने उपसून सद्या महाड शहराला एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे.
माळपठारावरील परिसरात तीव्र पाणीटंचाई
यवतमाळ : यवतमाळच्या पुसद तालुक्यातील माळपठारावरील भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाळा लागण्यापूर्वीपासून माळपठारावरील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना भेडसावते टँकर व विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्याचा प्रशासनाचा दरवर्षी प्रयत्न राहतो. तरी देखील नागरिकांची पाणीटंचाईतून काही केल्या सुटका होत नाही. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.