Ration Card New Rule saam Tv
बिझनेस

Ration Card New Rule: अंत्योदय अन्न योजनेत मोठा बदल; आता रेशनकार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल ७ किलो धान्य

Ration Card New Rules: केंद्र सरकारने अंत्योदय अन्न योजनेत बदलाचा प्रस्ताव मांडला आहे. आता 35 किलो निश्चित रेशनऐवजी सदस्यसंख्येनुसार प्रत्येक व्यक्तीसाठी 7 किलो धान्य देण्याची तरतूद करण्यात येणार आहे.

Shruti Vilas Kadam

Ration Card New Rules: देशभरातील कोट्यवधी रेशनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार 'राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013' अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. यासाठी सरकारने 'राष्ट्रीय अन्न सुरक्षा (सुधारणा) विधेयक, 2026' चा मसुदा जारी केला असून त्यावर नागरिकांकडून सहमती मागवण्यात आल्या आहेत.

सध्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत पात्र गरीब कुटुंबांना दरमहा एकूण 35 किलो धान्य दिले जाते. कुटुंबातील सदस्यांची संख्या कितीही असली तरी हे प्रमाण समान राहते. मात्र यामध्ये नवे बदल होणार असून रेशनचे वाटप कुटुंबातील सदस्यसंख्येच्या आधारावर केले जाणार आहे.

नव्या नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीला दरमहा 7 किलो धान्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कुटुंबात चार सदस्य असतील तर त्यांना 35 किलोऐवजी 28 किलो धान्य मिळेल. मात्र सरकारने एका कुटुंबाला मिळणाऱ्या धान्याची कमाल मर्यादा 35 किलोच ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे सहा किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य असलेल्या कुटुंबांनाही 35 किलोपेक्षा जास्त धान्य मिळणार नाही.

सरकारच्या मते, सदस्यसंख्येवर आधारित रेशन वाटप केल्यास धान्याचे अधिक नीट वाटप होईल. तसेच लाभार्थ्यांच्या गरजेनुसार अन्नधान्याचा पुरवठा करता येईल. दरम्यान, या मसुद्यावर नागरिक, तज्ज्ञ आणि संबंधित संस्थांकडून 13 जुलै 2026 पर्यंत सूचना व अभिप्राय मागवण्यात आले आहेत. त्यानंतरच या मसुद्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT