Krishi Thapanda: कन्नड चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय कन्नड अभिनेत्री कृषी थापांडाच्या बेंगळुरू येथील घरी एका ३३ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. अभिनेत्रीचे घर बेंगळुरूमध्ये 'आरआर नगर' भागात आहे. गुरुवारी कृषीच्या अपार्टमेंटमध्ये हा मृतदेह सापडला, त्यानंतर पोलिसांनी या घटनेशी संबंधित परिस्थितीचा तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना आरआर नगरमधील 'एलिगंट अपार्टमेंट्स' या इमारतीत घडली. मृत व्यक्तीची वय ३३ वर्षीय असून वैशाख असे त्याचे नाव होते, तो बुधवारी रात्री अभिनेत्रीच्या अपार्टमेंटमध्ये आला होता. फ्लॅटमध्ये कोणीही नसताना त्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
घटनेच्या वेळी ३६ वर्षीय अभिनेत्री कृषी थापांडा घरी नव्हती. ती घराबाहेर गेली होती. पोलिसांनी प्राथमिक तपास करून फॉरेन्सिक विभागाने पुरावे गोळा केले आहेत आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी व्हिक्टोरिया रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनाचा रिपोर्ट मिळाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. असे पोलिसांनी सांगितले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्तीचा कृषी थापंडाशी परिचय होता. मात्र त्यांचे नेमके संबंध काय होते आणि तो फ्लॅटमध्ये कशासाठी आला होता, याबाबत पोलिस चौकशी करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. पण, पोलिसांनी कोणतेही निष्कर्ष काढण्यापूर्वी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
कृषी थापंडा ही कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मिस कर्नाटक किताब जिंकल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. 'अकीरा', 'काही', 'लंके' यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांमुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच ती कन्नड 'बिग बॉस'मध्येही झळकली होती. मॉडेलिंग आणि चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी, कृषी थापांडा 'इंटरकॉल' (InterCall) या अमेरिकन कंपनीत असिस्टेंट मॅनेजर म्हणून काम केले; ही कंपनी ऑडिओ कॉन्फरन्सिंग आणि मीटिंग सेवा पुरवते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.