Saam Tv
बिझनेस

Airtel Job: एअरटेलने महाराष्ट्रात टॅलेंट डेव्हलपमेंटसाठी वाढवली कटिबद्धता; नवीन तरुणांना संधी

Airtel Campus Job: एकीकडे आयटी कंपन्यांमध्ये नवीन पदवीधरांना कमी संधी देण्यात येत आहे तर दुसरीकडे एअरटेल, मोबिलिटी, एअरटेल बिझनेस, होम्स, एअरटेल डिजिटल आणि एनक्सट्रा नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Airtel Campus Job Hiring College Palcement

देशात सध्या आयटी कंपन्याची खूप जास्त मागणी आहे. अनेकजण आयटी हे क्षेत्र करिअर म्हणून निवडतात. खूप लोक या इंडस्ट्रीत करिअर करण्याचे स्वप्न पाहत असतात. परंतु एका रिसर्जनुसार, येत्या वर्षी तब्बल ४० टक्के फ्रेशर्स मुलांची नियुक्ती कमी केली जाणार आहे.

टीमलीज च्या डेटानुसार, आयटी क्षेत्र 2,50,000 अभियंते ऑनबोर्ड झाल्यावर 2023 च्या तुलनेत 40% कमी फ्रेशर्सची नियुक्ती करेल. साधारणपणे ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत,आयटी प्रमुख कंपनी त्यांच्या कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रिया सुरू करतात परंतु या प्लेसमेंट सीझनमध्ये कंपनी कॅम्पसमधून अनुपस्थित आहेत. अलीकडे, अनेक भारतीय तंत्रज्ञान-सेवा आउटसोर्सिंग कंपन्यांनी महाविद्यालयीन पदवीधरांची नियुक्ती थांबवली आहे.

एकीकडे आयटी कंपन्यांमध्ये नवीन पदवीधरांना कमी संधी देण्यात येत आहे तर दुसरीकडे एअरटेल, मोबिलिटी, एअरटेल बिझनेस, होम्स, एअरटेल डिजिटल आणि एनक्सट्रा आपल्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी देशभरातील 100 हून अधिक महाविद्यालयांमधून कॅम्पस मधून 700 हायर करण्यासाठी सज्ज आहे.

सेल्स, इंजिनियरिंग आणि बिझनेस सोल्युशन्ससह विशिष्ट नोकरीच्या संधी महाविद्यालयांमधून पदवीधर झालेल्या मुलांना देण्यात येणार आहे. यासाठी कॅम्पस भर्ती कार्यक्रमांचा सक्रियपणे विस्तार करत आहे.

महाराष्ट्र हे एअरटेलसाठी एक महत्त्वाचे टॅलेंट हब बनले आहे. कमिन्स पुणे, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिजिटल अँड टेलिकॉम मॅनेजमेंट, सिम्बायोसिस सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एससीआयटी), के जे सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, एससीएमएचआरडी, एसआयबीएम, एनएमआयएमएस, एनआयटीआयई, एसपी जैन, के.के. वाघ इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च आणि भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग यांच्यासोबत कंपनीने पार्टनरशिप केली आहे.

तरुणांना त्यांच्या करिअरला गती देण्यासाठी विविध प्लॅटफॉर्म आणि संधी देण्याचे काम करणार आहे. या कॅम्पस प्रोग्राम्समधून मिळालेल्या नवीन नियुक्त्यांना संस्थेमध्ये प्रोडक्ट मॅनेजर, एरिया मॅनेजर, टेरिटरी सेल्स मॅनेजर, की अकाउंट मॅनेजर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, नेटवर्क इंजिनियर्स , सोल्यूशन आर्किटेक्ट आणि एनओसी इंजिनियर्स यासाठी नोकरीच्या संधी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT