एआयमुळे बँकिंग क्षेत्रात नोकर कपातीची सुरुवात
जागतिक स्तरावर बेरोजगारी वाढण्याची भीती
ऑटोमेशनमुळे पारंपरिक नोकऱ्यांवर परिणाम
रोहित कदम, साम प्रतिनिधी
एआयच्या वाढत्या वापरामुळे जगावर बेरोजगारीचं संकट वाढत चाललंय. अशातच आता एआयच्या वापरामुळे लाखो नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. आयटी क्षेत्रानंतर आता बँकिंग क्षेत्रावरही एआयमुळे बेरोजगारी कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. देशातील बड्या खासगी बँकांनी आपल्या कर्मचाऱी संख्येत कपात करायला सुरूवात केलीये.
एचडीएफसी बँकेत 2025 मध्ये कर्मचारी संख्या 2 लाख 14 हजार होती. ती 2026 मध्ये 2 लाख 11 हजारावर आली. म्हणजे जवळपास चार हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली.
तर अॅक्सिस बँकेची कर्मचारी संख्या देखील गेल्या वर्षी 1 लाख 4 हजारांवरून यंदा 1 लाख 1 हजारापर्यंत कमी झाली.
आरबीएल बँकेत 2025 मध्ये 14 हजार 265 कर्मचारी होते. त्याची संख्या 2026 मध्ये थेट 13 हजार 316 पर्यंत खाली आली.
आयसीआयसीआय बँकेतही कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात झाल्याचं दिसून येतंय. 2025 या आर्थिक वर्षात कर्मचारी संख्या 1 लाख 30 हजार होती. ती यंदा 1 लाख 24 हजारांवर आली. म्हणजे गेल्या वर्षात जवळपास 6 हजार कर्मचाऱ्यांची कपात झाल्याचं दिसतंय.
एकीकडे एआयमुळे बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात होत असली तरी दुसरीकडे बँका आपल्या शाखांचा विस्तार करत असल्याचं दिसून येतयं.
एचडीएफसी बँकेने 234 नवीन शाखा सुरू केल्या.
अॅक्सिस बँकेने गेल्या वर्षभरात 400 नवीन शाखा सुरू केल्या.
तर ICICI बँकेने देशभरात जवळपास 600 नवीन शाखा सुरू केल्या आहेत.
एआयमुळे बँकिंग क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात नसून ते शिकणं महत्वाचं असल्याचं मत बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदवलंय.
बँकिंगमधील ऑपरेशन्स, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, लोन प्रोसेसिंग आणि कस्टमर सपोर्ट यांसारखी कामं आता चॅटबॉट्स आणि एआय अल्गोरिदमद्वारे केली जात आहेत. जे काम करण्यासाठी बँकांना अनेक माणसांची गरज असते तेच काम आता एआय करू लागलाय. एकीकडे, तंत्रज्ञानामुळे प्रॉडक्टिव्हिटी वाढली असून बँका आता 'लेस ह्युमन, मोर टेक' या धोरणावर काम करत आहेत. त्यामुळे एआय तंत्रज्ञान आत्मसात करून रोजगार वाढणार की एआयमुळे असाच नोकरकपातीचा सामना करावा लागणार हा खरा प्रश्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.