भारतात 7 सीटर कार खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोठे कुटुंब असल्याने 7 सीटर कारने प्रवास करणे सोयीस्कर होते. त्यामुळे अनेकजण 7 सीटर कार खरेदी करण्याचा विचार करतात. योग्य बजेट असल्यास ही कार खरेदी केली जाऊ शकते. आज आम्ही तुम्हाला १० लाखांपर्यंतच्या 7 सीटर कारची माहिती देणार आहोत. (Latest News)
Maruti Suzuki Ertiga
मारुती सुझुकी हा वाहन उत्पादनात नावाजलेली कंपनी आहे. कंपनी नेहमीच भारतीय ग्राहकांचा विचार करुन नवनवीन कार लाँच करत असते. मारुती सुझुकीची एरटिगा कार सर्वाधिक विकली जातत आहे. ही कार भारतीय कुटुंबियांसाठी एकदम परफेक्ट आहे. या कारची किंमत ८.६४ लाख रुपयांपासून सुरू होते.
Maruti Eeco
मारुतीची Eeco ही 7 सीटर कार प्रसिद्ध आहे. कमी किंमतीत हा कार खरेदी करु शकतात. या कारची किंमत ५.५६ लाख रुपये आहे. ही कार 16.11 kmpl मायलेज देते.
Mahindra Balero
7 सीटर कार घ्यायचा विचार करत असाल तर महिंद्रा बोलेरो हा उत्तम पर्याय आहे. या कारची किंमत ९.७८ रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 1498cc इंजिन देण्यात आले आहे.
Renault Triber
Renault Triber ही एक उत्तम 7 सीटर कार आहे. कारची किंमत ६.३३ लाख ते ८.९७ रुपयांपर्यंत आहे. या कारमध्ये 999cc इंजिन देण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.