Gautam Adani Group  Saam Tv
बिझनेस

Adani Group: अदानी ग्रुपला बाप्पा पावला, २५ वर्षे महाराष्ट्राला वीज पुरवण्याचे कंत्राट मिळालं!

Adani Group Got Contract To Supply Electricity To Maharashtra: अदानी ग्रुपला महाराष्ट्रात वीजपुरवठ्याचे कंत्राट मिळाले आहे. तब्बल २५ वर्षांसाठी त्यांना हे कंत्राट मिळाले आहे.

Priya More

अदानी ग्रुपशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. अदानी ग्रुपने मोठ्या कंपन्यांना मागे टाकत तब्बल २५ वर्षांसाठी मोठी बोली जिंकली आहे. अदानी ग्रुपला महाराष्ट्रात वीजपुरवठ्याचे कंत्राट मिळाले आहे. महाराष्ट्रामध्ये वीजपुरवठा करण्याच्या कंत्राटासाठी लावलेली बोली अदानी ग्रुपने जिंकली आहे. ही बोली जिंकल्यामुळे अदानी ग्रुपला महाराष्ट्राला ६,६०० मेगावॅट वीज पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवामध्ये अदानी ग्रुपला बाप्पा पावल्याचे म्हटले जात आहे.

अदानी ग्रुपने महाराष्ट्राला ६,६०० मेगावॅट बंडल रिन्युएबल आणि औष्णिक वीज पुरवण्याची बोली जिंकली आहे. जेएसडब्ल्यू एनर्जी आणि टोरंट पॉवर या कंपन्यांपेक्षा कमी दर लावून अदानी ग्रुपने हे कंत्राट मिळवले आहे. कंपनीने यासाठी ४.०८ रुपये प्रति युनिट बोली लावली आणि यासह या ग्रुपने जेएसडब्ल्यू एनर्जी आणि टोरेंट पॉवरला मागे टाकले.

अदानी ग्रुपकडून २५ वर्षांसाठी औष्णिक आणि सोलार वीजपुरवठ्यासाठी लावलेली बोली महाराष्ट्रातील सध्याच्या वीज खरेदीच्या दरापेक्षा एक रुपयाने स्वस्त आहे. अदानी ग्रुपला लेटर ऑफ इंटेट जारी केल्यानंतर ४८ महिन्यांच्या आतमध्ये विजेचा पुरवठा सुरू करावा लागणार आहे. अदानी ग्रुपला हे कंत्राट मिळाल्यामुळे आता महाराष्ट्रातील विजेची गरज पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या बोलीदरमय्यान काही नियम आणि अटी ठरल्या होत्या. त्यानुसार, अदानी ग्रुप संपूर्ण कालावधीत २.७० रुपये प्रति युनिट दराने सौर ऊर्जा पुरवणार आहे. तर औष्णिक विजेचे दर कोळशाच्या किमतीनुसार ठरवले जातील. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने मार्च महिन्यात ५ हजार मेगावॅट सोलार विजेसाठी तसेच १६०० मेगावॅट औष्णिक वीज खरेदी करण्यासाठी विशेष निविदा काढली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT