Gautam Adani : गौतम अदानींचा यशाचा फॉर्म्युला कोणता? फक्त ३ शब्दांत सांगितलं सर्वकाही...

Gautam Adani Successful Mantra :पैसे कमावण्याचा कोणताही फॉर्म्युला नाही, असं मला वाटतं. उद्योग किंवा प्रॅक्टिकल लाइफमध्ये एकच फॉर्म्युला यशस्वी होतो.
Gautam Adani : गौतम अदानींचा यशाचा फॉर्म्युला कोणता? फक्त ३ शब्दांत सांगितलं सर्वकाही...

Gautam Adani Successful Mantra : जगातील तिसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी इंडिया टीव्हीच्या कार्यक्रमात 'आप की अदालत'मध्ये आपल्या आयुष्याशी संबंधित अनुभव शेअर केले. पैसे कमावण्याचा कोणताही फॉर्म्युला नाही, असं मला वाटतं. उद्योग किंवा प्रॅक्टिकल लाइफमध्ये एकच फॉर्म्युला यशस्वी होतो. तो म्हणजे मेहनत...मेहनत आणि मेहनत. त्यानंतर मला माझं कुटुंब, माझ्या सहकाऱ्यांची साथ आणि देवाचा आशीर्वादही मिळाला. देशाची प्रगती होवो हाच माझा उद्देश आहे, असंही अदानी म्हणाले.

गौतम अदानी म्हणाले की, मी १५ वर्षांचा होतो. १० वी परीक्षा पास झालो होतो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अशी होती की मी शिक्षण पूर्ण न करता मुंबईला निघालो. मुंबईत चार वर्षे राहिलो. त्यानंतर मी पुन्हा अहमदाबादला गेलो. मुंबईने मला खूप काही शिकवलं.

मुंबईत मी खूप काही शिकलो. मी मेहनत करण्यास शिकलो. त्यानंतर माझ्या उद्योगाचा पाया रचला गेला. शिक्षण खूप गरजेचे आहे. मी आज चांगलं शिकलो असतो तर कदाचित आज गौतम अदानीपेक्षाही चांगला झालो असतो. माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी मला अनेकांनी आधार दिला. मला वाटतंय की शिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्ञान वाढते, असेही अदानी यावेळी म्हणाले.

Gautam Adani : गौतम अदानींचा यशाचा फॉर्म्युला कोणता? फक्त ३ शब्दांत सांगितलं सर्वकाही...
आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट होणार; अदानी करणार धारावीचा विकास

आमचं कुटुंब मध्यमवर्गीय होतं. छोटासा उद्योग होता. एक उत्साह होता. एक १९ वर्षांचा मुलगा आपल्या कुटुंबाच्या उद्योगाव्यतिरिक्त स्वतःचा असा काही वेगळा उद्योग करण्याची इच्छा बाळगून होता. माझ्या कुटुंबानं मला मोठा पाठिंबा दिला. मी शिक्षणात खूप हुशार होतो. पण वेळ अशी आली की मी म्हणालो शिक्षणाचं नंतर बघू आणि मग उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवलं, अशी आठवणही अदानी यांनी यावेळी सांगितली.

Gautam Adani : गौतम अदानींचा यशाचा फॉर्म्युला कोणता? फक्त ३ शब्दांत सांगितलं सर्वकाही...
Gautam Adani : अदानी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती, गौतम अदानींचा आणखी एक विक्रम | SAAM TV

'राजीव गांधी पंतप्रधान असताना मोठी संधी मिळाली'

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना कशा प्रकारे मदत मिळाली असा प्रश्न गौतम अदानींना कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावर अदानी यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. माझ्या आयुष्यात मला तीन मोठ्या संधी मिळाल्या, असे त्यांनी सांगितले.

१९८५मध्ये राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यावेळी नवं आयात-निर्यात धोरण आलं. आमची कंपनी एक ग्लोबल ट्रेडिंग हाउस बनली. दुसरी मोठी संधी १९९१ मध्ये मिळाली. नरेंद्र मोदी १२ वर्षे मुख्यमंत्री होते, तेव्हाचा माझा अनुभव खूप चांगला होता.

पण मी हे सांगू इच्छितो की, मोदींकडून तुम्ही कोणतीही वैयक्तिक मदत घेऊ शकत नाही. तुम्ही त्यांच्याकडे धोरणविषयक चर्चा करू शकता. देशहिताच्या गोष्टी करू शकता. जी धोरणं तयार केली जातात, ती सर्वांसाठी असतात. एकट्या अदानी ग्रुपसाठी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com