Koradi Thermal Power Station : महानिर्मिर्ती १३२० मेगावॅटचा औष्णिक वीज प्रकल्प उभारणार, कुठे होणार प्रकल्प? जाणून घ्या

Koradi Thermal Power Station : राज्याच्या विजेच्या वाढत्या मागणीच्या पाश्वभूमीवर महानिर्मितीने कोराडी औष्णिक वीज केंद्रात १३२० मेगावॅटचे औष्णिक वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
Koradi Thermal Power Station
Koradi Thermal Power StationSaam Digital
Published On

Koradi Thermal Power Station

राज्याच्या विजेच्या वाढत्या मागणीच्या पाश्वभूमीवर महानिर्मितीने कोराडी औष्णिक वीज केंद्रात १३२० मेगावॅटचे औष्णिक वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित सदरचा वीज प्रकल्प असणार आहे. त्यासाठी महानिर्मितीने केंद्रीय पर्यावरण विभागाच्या मंजूरीसाठी अर्ज केला असून त्यांची परवानगी मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.

महानिर्मितीची औष्णिक वीज निर्मिती क्षमता १३ हजार मेगावॅटच्या घरात असून त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. सध्या कोराडी वीज केंद्राची २१०० मेगावॅटची क्षमता आहे. त्यामध्ये ६६० मेगावॅटचे आणखी दोन वीज संच उभारले जाणार आहेत. त्याला महानिर्मितीच्या छत्तीसगड राज्यातील गरेपालमा कोळसा खाणीतून कोळसा पुरवठा केला जाणार आहे. सदर वीज प्रकल्पाच्या उभारणीसाठी प्रतिमेगावॅटला सुमारे ७ कोटी रूपये एवढा खर्च येणार असल्याने एकूण खर्च १० हजार कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतरच प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती संचालक (प्रकल्प) अभय हार्णे यांनी दिली.

Koradi Thermal Power Station
Kalyan Politics : कल्याणमध्ये शिंदे गट-भाजपमध्ये धुसपूस? आमदार गायकवाडांच्या पत्नीच्या राजकीय एन्ट्रीने चर्चांना उधाण

दररोज १७ हजार मेट्रिक टन कोळशाची अवश्यकता

महानिर्मितीकडून ६६० मेगावॅटचे दोन संच उभारले जाणार आहेत. त्या माध्यमातून वीज निर्मिती करण्यासाठी दररोज तब्बल १७ हजार मेट्रिक टन कोळसा लागणार आहे. सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित सदरचा वीज प्रकल्प असल्याने स्थापित क्षमतेच्या सुमारे ८५-९० टक्के एवढी वीज निर्मिती होऊ शकणार आहे.

Koradi Thermal Power Station
Baramati News: 'बारामती शहर विकासाचे रोल मॉडेल', अजित पवार यांचं नावं घेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com