एसी, फ्रिजच्या किंमती वाढल्या
सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा फटका
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. एसी, फ्रिजच्या किंमतींमध्ये वाढ होणार आहे. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएंसी (BEE)स्टार रेटिंगचे नवे नियम लागू झाले आहे. आजपासून हे नियम लागू करण्यात आले आहेत. यामुळे 5 स्टार एसी, फ्रिज किंवा इतर कूलिंग प्रोडक्ट्सचे ददर वाढणार आहेत.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ पासून BEE स्टार रेटिंगचे आजपासून नवीन नियम लागू होणार आहे. BEE च्या या नवीन नियमानुसार एसी आणि फ्रिजच्या किंमतीत ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाल्याची पाहायला मिळू शकते. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे.
सप्टेंबरमध्ये एसी अन् फ्रिज झाले होते स्वस्त
सप्टेंबर महिन्यात जीएसटी दरात कपात झाली होती तेव्हा एसीच्या किंमती १० टक्क्यांनी कमी झाल्या होत्या. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता BEE स्टार नियम लागू झाल्यानंतर पुन्हा किंमती वाढल्या आहेत.
BEE स्टार रेटिंग आहे तरी काय? (What is BEE Star Rating)
एसी, फ्रिज, टिव्ही आणि वॉशिंग मशीनवर स्टार रेटिंग दिली आहे. ५ स्टार रेटिंग म्हणजे कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू किती जास्त प्रमाणात विकत घेतली जाते. त्यावर त्याचे रेटिंग ठरवले जाते.
एसी आणि फ्रिजच्या किंमती का वाढल्या? (AC, Fridge Price Hike)
BEE च्या नवीन एनर्जी एफिशिएंसचीचे नियम लागू झाले आहेत. डॉलरच्या तुलनेने रुपयात घसरण झाली आहे. याचसोबत तांबे आणि कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे एसी आणि फ्रिजच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.