ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मूग हा कडधान्याचा प्रकार आहे. विशेषतः मोड आलेले मूग आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.
मोड आलेल्या मुगांना ताज्या भाज्यांमध्ये मिक्स करा आणि त्यावर लिंबू पिळून खायचा आनंद घ्या.
बेसन आणि मूग मिक्स करुन चिला बनवा आणि हिरव्या चटणी सोबत खा.
मुगांना इतर भाज्यांसोबत उकडवा, उकडल्या नंतर ते बारीक करुन घ्या आणि त्यात मसाले टाकून सूप तयार करा.
मूग मिक्सरमध्ये बारिक करुन त्याची पेस्ट तयार करा आणि पीठात मिक्स करुन पराठे बनवा.
मूग आणि तांदूळ घ्या त्यात थोडी मुगाची डाळ देखील टाका. सगळे साहित्य मिक्स करुन त्यात मसाले टाका आणि खिचडी बनवा.
मूग रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठस्यावर ते सोलून त्याची पेस्ट बनवून घ्या आणि इडली बनवा.