ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि व्हिटॅमिन के असते म्हणून, काकडी शरीराला उन्हाळ्यात हायड्रेटेड आणि ताजेतवाने ठेवते.
दुधी भोपळ्यामध्ये ९२% पाणी असते, त्यामुळे उन्हाळ्यात दुधी भोपळा शरीराला थंडावा देतो.
अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले पालक शरीराला शांत आणि थंड करते.
टॉमेटो हा लायकोपीन आणि व्हिटॅमिन सी ने भरलेला असतो त्यामुळे टोमॅटो सूर्यापासून संरक्षण करतो.
पुदिना ही एक थंडगार औषधी वनस्पती आहे. उन्हाळ्यात थंड वाटणाऱ्या पेयांमध्ये पुदिना टाकला जातो.
भेंडीमध्ये असलेले पाणी आणि फायबर उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवतात.
उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढते आणि थकवा, डिहायड्रेशन यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, म्हणून थंड भाज्यांचे सेवन करा आणि शरीराला ताजेतवाने ठेवण्यास मदत करा.