Shruti Vilas Kadam
महिलांनी स्वतःसाठी एखादी खास ज्वेलरी खरेदी करणे हा स्वतःला दिलेला सुंदर गिफ्ट ठरू शकतो. नेकलेस, रिंग किंवा ब्रेसलेट तुमच्या लूकला खास बनवू शकतात.
रोजच्या धावपळीमध्ये स्वतःसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे स्पा, मसाज किंवा ब्यूटी ट्रीटमेंट घेऊन स्वतःला रिलॅक्स करणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
International Women's Day निमित्ताने स्वतःसाठी एखादा आवडता ड्रेस, कुर्ता किंवा साडी घेणे हा देखील छान गिफ्ट आयडिया आहे.
वाचनाची आवड असेल तर स्वतःसाठी एखादे प्रेरणादायी किंवा आवडते पुस्तक घेणे हा खूप चांगला पर्याय आहे. यामुळे मनही शांत राहते.
हेल्दी राहण्यासाठी योगा मॅट, फिटनेस बँड किंवा स्पोर्ट्स शूज खरेदी करणे हा स्वतःसाठी उपयुक्त गिफ्ट ठरू शकतो.
स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी एखादा छोटा ट्रिप किंवा वीकेंड गेटवे प्लॅन करा. यामुळे मन प्रसन्न होते आणि नवीन ऊर्जा मिळते.
पेंटिंग, कुकिंग, डान्स किंवा संगीत यासारखी तुमची आवडती गोष्ट करण्यासाठी वेळ द्या. स्वतःसाठी वेळ देणे हेच सर्वात खास गिफ्ट आहे.