आधार कार्ड अपडेट करणे झाले सोपे
आधार अपडेटसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
UIDAI ने जारी केले नवे नियम
UIDAI ने आधारकार्डधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता आधार कार्ड अपडेट करणे खूप सोपे झाले आहे. तुम्हाला जर आधार कार्डवरील कोणतीही माहिती बदलायची असेल तर त्याची प्रोसेस सोपी केली आहे. आता UIDAIने पत्त्याचा पुरावा, जन्मतारीख आणि रिलेशनशिप पुराव्यासाठी वैध कागदपत्रे स्पष्ट केली आहे. म्हणजेच आधार कार्डवरील नाव, पत्ता बदलण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबाबत माहिती दिली आहे.
आधार कार्डवरील नाव बदलणे (Aadhaar Card Name Change)
UIDAI च्या नवीन अपडेटनुसार काही कागदपत्रे स्विकारली जाणार आहे. यामध्ये पासपोर्टचा समावेश आहे. पासपोर्टव तुमचे नाव, जन्मतारीख आणि पत्ता याबाबत माहिती असते. याचसोबत पॅन कार्डदेखील वैध कागदपत्र म्हणून स्विकारले जाईल. यावर सर्व माहिती असते. दरम्यान, वोटर आयडीवर तुमचा फोटो आणि नाव असते त्यामुळे आधार अपडेटसाठीही हे ग्राह्य धरले जाईल. ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी ओळखपत्र, मॅरेज सर्टिफिकेटदेखील स्विकारले जातील.
पत्ता बदलण्यासाठी कागदपत्रे(Aadhaar card Address Proof Change)
आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी पासपोर्ट, बँकेचे पासबुक किंवा बँक स्टेटमेंट स्विकारले जाईल. वीजेचे बिल, पाण्याचे बिल आणि गॅस बिलदेखील ग्राह्य धरले जाईल. मात्र, हे बिल जास्त जुने नसायला हवे. भाडेकरुंना अॅग्रीमेंटसोबत पोलिस व्हेरिफिकेशन किंवा नोटरी आवश्यक आहे.
जन्मतारीख बदलण्यासाठी कागदपत्रे
आता जन्मतारीख अपडेट करायची असेल तर जन्म प्रमाणपत्र, १०वी-१२वीचे मार्कशीट, पन कार्ड ही कागदपत्रे ग्राह्य धरली जातील.
आधार अपडेट कसे करायचे? (Aadhaar Update Process)
सर्वात आधी तुम्हाला Aadhaar Enrollment/Update सेंटर किंवा myAadhaar या अॅपवर जा.
यानंतर तुम्हाला जी माहिती बदलायची आहे त्यावर क्लिक करा. महत्त्वाचे कागदपत्र अपलोड करा.
यानंतर तुम्हाला तुमची योग्य माहिती भरायची आहे.
यानंतर आधार अपडेट झाल्यानंतर तुमच्या पत्त्यावर पाठवल्या जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.