Aadhaar Card Update Google
बिझनेस

Aadhaar Card Update: आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

Aadhaar Download Without Otp: आधार कार्डासाठी आता तुम्हाला otpची गरज नाही. तुम्ही uidai ने फेस ऑथेंटिकेशन सुविधा सुरु केली आहे. मोबाईल नंबर लिंक नसला तरीही आधार डाउनलोड करता येणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

UIDA ने महत्वाची माहिती दिली आहे

आधार कार्डासाठी OTP ची गरज नाही

आधार कार्ड तुम्ही डाउनलोड करण्याची प्रोसेस

अनेकांना आधार कार्ड बनवण्यासाठी किंवा त्यात काही बदल करण्यासाठी मोबाईल नंबरवर येणाऱ्या ओटीची गरज लागायची. अनेकांना यामध्ये उशीरा OTP यायचा किंवा अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागायचं. आता टेन्शन सोडा. कारण नवीन अपडेटमध्ये मोबाईल नंबर लिंक नसला तरीही तुमचं काम थांबणार नाही. तुम्हाला यामध्ये या पुराव्याची गरज भासणार नाही.

आता आधारच्या नियमात बदल झाला आहे. त्यामध्ये UIDAI ने Face Authentication सारखी नवी सुविधा सुरू केलीये. त्याच्या मदतीने तुम्ही OTP शिवायही ओळख पडताळणी करु शकता. यामुळे आता Aadhaar PVC कार्ड थेट घरी मागवू शकता.

त्यासाठी UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन Order Aadhaar PVC Card या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर Aadhaar नंबर किंवा VID टाकून आवश्यक माहिती भरायची आणि पेमेंट करायचं आहे. ही साधी सोपी प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागेल.

Face Authentication करण्याची ही खूप प्रोसेस सोपी आहे. मोबाईल किंवा अ‍ॅपमध्ये कॅमेरा सुरू करून तुमचा चेहरा स्कॅन केला जातो आणि तो Aadhaar डेटाशी जुळवला जातो. यामुळे OTPची तुम्हाला लागणार नाही. तुम्ही आधार कार्ड हे Download Aadhaar या अॅपमधून करु शकता. त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळेल. त्याचा पासर्वड हा तुमच्या नावाची पहिली ४ अक्षरे आणि जन्माचे साल असे असेल.

UIDAI ने आधार युजर्ससाठी हा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत आधार कार्ड डाउनलोड किंवा अपडेट करण्याठी तिथे otp नंबर देणं अनिवार्य होतं. त्यामुळे ज्यांचा ज्या व्यक्तींचा मोबाईल नंबर लिंक नाही, त्यांना अडचणींना सामोरं जावं लागत होतं. आता हे टेन्शन अखेर संपलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning tea: चहा पिण्यापूर्वी ही 1 सोपी गोष्ट करा; अॅसिडिटी किंवा जळजळीचा त्रास होणार नाही

Maharashtra News Live Update: इंगळून घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू, प्रशासन सतर्क

धावत्या ईव्ही बंद करणारं अॅप, वाहन चालकांना चिनी अॅपचा धसका

Sunday Horoscope : कोणाच्या नशिबात धनलाभ, तर कोणाला करिअरमध्ये घ्यावी लागेल मोठी काळजी? वाचा रविवारचे राशीभविष्य

Panvel Tourism: माथेरान-महाबळेश्वरही पडेल फिकं; पनवेलपासून 150 किमी लांब असलेलं हिल स्टेशन या विकेंडला ठरेल बेस्ट पिकनीक स्पॉट

SCROLL FOR NEXT