Aadhaar Card Download Saam Tv
बिझनेस

WhatsApp वरुन २ मिनिटांत करा आधार कार्ड डाउनलोड, स्टेप बाय स्टेप प्रोसेस करा फॉलो

Aadhaar Card Download on Whatsapp Step by Step Process: आधार कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. सध्याच्या काळात तुम्ही डिजिटल आधार कार्डदेखील वापरु शकतात. हे आधार कार्ड व्हॉट्सअॅपद्वारे डाउनलोड करता येईल.

Siddhi Hande

आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. अनेक सरकारी कामांसाठी आधार कार्ड गरजेचे आहे. तुमच्याकडे जर आधार कार्डची कॉपी नसेल तर तुम्ही डिजिटल आधार कार्डदेखील दाखवू शकतात. डिजिटल आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे मानले जाते. तुमच्या आधार कार्डचे पीडीएफ तुम्हाला दिले जाते. दरम्यान, आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरुनदेखील आधार कार्ड डाउनलोड करु शकतात.

तुम्ही अवघ्या काही मिनिटांत आधार कार्डची पीडीएफ डाउनलोड करु शकतात. यासाठी तुम्हाला आधारच्या वेबसाइटवर जाण्याची काहीही गरज नाही. काही मिनिटांत आधारची पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. व्हॉट्सअॅप कसं डाउनलोड करायचं ते जाणून घ्या.

आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं? (How to Download Aadhaar Card)

सर्वात आधी तुम्हाला 9013151515 हा नंबर सेव्ह करायचा आहे.

यानंतर नंबरवर Whatsapp वर Hi असा मेसेज करायचा आहे.

यानंतर तुम्हाला Digi Locker वर क्लिक करायचं आहे.

यानंतर Digi Locker अकाउंट निवडा. जर अकाउंट नसेल तर ते क्लिक करा.

यानंतर तुम्हाला १२ अंकी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.

यानंतर मोबाईल नंबरवरील ओटीपी व्हॉट्सअॅपवर पाठवायचा आहे.

यानंतर ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर डिजिलॉकरच्या सर्व कागदपत्रांची लिस्ट तुम्हाला दिसेल. त्यामधील आधार कार्डवर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर आधार कार्डची पीडीएफ मिळणार आहे.

DigiLocker वर अकाउंट कसं उघडायचं?

सर्वात आधी तुम्हाला डिजिलॉकर अॅप किंवा वेबसाइटवर जायचे आहे.

यानंकर साइन अप करुन मोबाईल नंबर टाकायचा आहे.

तुमच्या फोनवर आलेला ओटीपी टाका. यानंतर अकाउंटचे नाव आणि पासवर्ड निवडा.

यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर टाकून व्हेरिफिकेशन करायचे आहे.

यानंतर तुमचे सर्व कागदपत्र तुम्ही अॅक्सेस करु शकतात. याचसोबत कागदपत्रदेखील लिंक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil-Bhau Kadam : 'हिल हिल पोरी हिला...'; गौतमी पाटील अन् भाऊ कदम यांच्या केमिस्ट्रीची जादू, पाहा Unseen Photo

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 92% ते 283% पर्यंत वाढ होणार? सरकार किती वाढवणार फिटमेंट फॅक्टर? वाचा...

कांदा भजी खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा फणसाची भजी, सोपी रेसिपी

LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर ६५८ रुपयांनी स्वस्त मिळतोय, १०.५८ कोटी कुटुंबांना ९५८ रुपयांचा बंपर फायदा, पाहा नेमकं गणित

SCROLL FOR NEXT