यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अनेकदा चांगले करिअर सुरु असतानाही अनेकांचे देशसेवा करण्याचे स्वप्न असते. असंच स्वप्न कार्तिक मधीरा यांचे होते. त्यांनी क्रिकेटविश्वात आपले नावलौकिक कमावले. उत्तम क्रिकेटर असतानाही त्यांनी पोलिस सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आणि यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. (IPS Kartik Madhira Success Story)
कार्तिक मधीरा हे मुळचे हैदराबादचे रहिवासी. त्यांनी अंडर १13,15,17 आणि 19 मध्ये युनिव्हर्सिटी लेव्हलवर किकेट खेळले आहे. परंतु त्यांच्या आयुष्यात एक असं वळण आलं की ज्याने त्यांचं सर्व आयुष्यच बदललं.
कार्तिक यांनी जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली केली. मिडिया रिपोर्टनुसार, क्रिकेटचं करिअर सोडून आयपीएस ऑफिसर बनण्यामागे त्यांचे काही वैयक्तिक कारण होते. त्यांनी ६ महिने डेलॉयटसारख्या मोठ्या कंपनीत कामदेखील केले होते. परंतु त्यांना नेहमीच सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याची इच्छा होती.
कार्तिक यांना ३ वेळा अपयश मिळाले. ते साधे प्रिलियम्स परीक्षादेखील क्लिअर करु शकले नाही. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा (UPSC) पास केली. त्यांनी १०३ रँक मिळवली.
कार्तिक यांची आयपीएसपदी (IPS) निवड झाली. त्यांनी नेहमी सराव करण्यावर भर दिली. त्यांनी अनेक टेस्ट सीरीजचे प्रश्न सोडवले. त्यांनी आपल्यातील सर्व गोष्टी सुधारल्या. याचसोबत आपल्या व्यक्तिमत्वावरदेखील काम केले. त्यांनी क्रिकेटमध्ये करिअर करायचे सोडून देशसेवा करण्याचा निर्णय घेतला.
आयपीएस कार्तिक यांची महाराष्ट्र कॅडरमध्ये निवड झाली. ते सध्या लोणावळा येथे एएसपी म्हणून कार्यरत आहेत. ते सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतात. नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करत असतात. ते अनेकदा त्यांची क्रिकेटची आवडही जोपासताना दिसतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.