Nidhi Tewari: एकदा नाही तर तब्बल चार वेळा स्पर्धा परीक्षा क्रॅक; झाल्या IFS ऑफिसर, आता थेट पीएम मोदींच्या सेक्रेटरीपदी नियुक्ती; निधी तिवारी आहेत तरी कोण?

Success Story Of IFS Nidhi Tewari: आयएफएस निधी तिवारी यांची पंतप्रधान मोदींच्या सचिवपदी निवड झाली आहे. त्यांनी एकदा नव्हे तर चार वेळा स्पर्धा परीक्षा क्रॅक केली आहे. दोनदा उत्तर प्रदेश नागरी सेवा परीक्षा आणि दोन वेळा यूपीएससी परीक्षा पास केली आहे.
Nidhi Tewari
Nidhi TewariSaam Tv
Published On

सध्या आयएफएस ऑफिसर निधी चौधरी या खूप चर्चेत आल्या आहे. निधी चौधरी या पंतप्रधान मोदीं यांच्या वैयक्तिक सचिवपदी काम करणार आहेत. त्यांची पंतप्रधान कार्यालात नियुक्ती झाली आहे. त्यांनी खूप कमी वयात हे यश मिळवली आहे. त्यांनी एकदा नाही तर तब्बल चार वेळा स्पर्धा परीक्षा पास केली आहे. (Success Story Of IFS Nidhi Tewari)

Nidhi Tewari
Farmer Success Story : आयुर्वेदिक वन औषधी पिक लागवडीतून लाखो रुपयांची कमाई; नांदेडच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

IFS निधी तिवारी यांची पंतप्रधानांच्या सचिवपदी नियुक्ती

निधी तिवारी या आधी शास्त्रज्ञ पदावर काम करत होत्या. त्यांनी ही नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी यूपीपीएससी परीक्षा पास केली. परंतु सरकारी नोकरी असतानाही त्यांचे समाधान झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पुन्हा काहीतरी करण्याचे ठरवले. त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी दोन वेळा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यानंतर त्या IFS ऑफिसर झाल्या.

निखी तिवारी यांनी विदेश मंत्रालयात काम केले आहे. त्यानंतर त्यांनी पीएमओमध्येदेखील (PMO) काम केले आहे. त्या आता पंतप्रधान मोदी यांच्या पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करणार आहेत.त्या याआधी पीएमओमध्ये डेप्युटी सेक्रेटरी होत्या.

Nidhi Tewari
Success Story: १०वीत फक्त ४४ टक्के, तब्बल १३ वेळा अपयश, जिद्द सोडली नाही, UPSC क्रॅक केलीच;IAS अवनीश शरण यांचा प्रेरणादायी प्रवास

IFS निधी तिवारी यांचा प्रवास (IFS Nidhi Tiwari Journey)

IFS निधी तिवारी यांनी सुरुवातीचे शिक्षण लखनऊमध्ये केले. त्यांनी बीएससी बायोलॉजीमधून ग्रॅज्युएशन केले. यानंतर त्यांनी बायोकेमेस्ट्रीमध्ये पदव्युतर शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी भाभा अणु संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. परंतु त्यांचे या कामात मन लागले नाही. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. त्यानंतर त्यांना सरकारी नोकरी करण्याची संधी होती. परंतु त्यांना काहीतरी वेगळे करायचे होते.

निधी तिवारी यांनी पुन्हा २०१२ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्या पास झाल्या परंतु त्यांना कोणतेही कॅडर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्यांना १६वी रँक मिळाली होती. त्यांची आयएफएस ऑफिसर म्हणून निवड झाली.

Nidhi Tewari
Success Story: IIM मधून MBA, लाखो रुपयांची नोकरी सोडली, दुसऱ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC; महाराष्ट्राच्या लेकीची यशोगाथा वाचा

परराष्ट्र मंत्रालयात काम ते थेट पंतप्रधान मोदींच्या कार्यालयात काम

आयएफएस ऑफिसर म्हणून निधी यांची परराष्ट्र मंत्रायलयात नियुक्ती झाली. येथे त्यांनी खूप चांगले काम केले. २०२२ मध्ये त्यांची पंतप्रधान मोदींच्या कार्यालयात नियुक्ती झाली. यानंतर त्यांना एका वर्षाने बढती मिळाली. त्या डेप्युटी सचिव म्हणून काम करत होत्या. त्यानंतर आता त्यांना पंतप्रधान मोदींची पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

Nidhi Tewari
Success Story: एमबीए केलं, बँकेत ऑफिसर म्हणून काम, फुल टाइम नोकरी करत UPSC क्रॅक; IAS स्तुति चरण आहेत तरी कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com