8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: वर्षाला इक्रिमेंट, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टर; आठव्या वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

8th Pay Commission Salary Hike Update: आठव्या वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत. आठव्या वेतन आयोगाला या मागण्यांचा विचार करुन शिफारसी तयार कराव्या लागणार आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बातमी

कर्मचाऱ्यांची केल्या महत्त्वाच्या मागण्या

पगार आणि पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी काही मागण्या

आठव्या वेतन आयोगाची लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक वाट पाहत आहे. केंद्र सरकार आठव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात चांगली वाढ करु शकते. यासाठी शिफारसी तयार केल्या जात आहे. आठव्या वेतन आयोगाचे काम सुरु झाल्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये टर्म्स ऑफ रेफरन्स जाहीर केले. सरकारने यासाठी १८ महिन्यांचा वेळ दिला आहे. या कालावधीत शिफारसी लागू केल्या जातील. यावर फिटमेंट फॅक्टर ठरवला जाईल. यानंतर पगारवाढ केली जाईल. दरम्यान, याचसोबत कर्मचाऱ्यांनीह काही मागण्या केल्या आहे.

१ जानेवारी २०२६ पासून लागू करण्याची मागणी (8th Pay Commission Implementation Date)

ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस (AITUC)ने मागणी केली आहे की, वेतन, पेन्शन, भत्ते हे सर्व १ जानेवारी २०२६ पासून लागू करावेत. जर असे झाले तर कर्मचाऱ्यांना १ जानेवारीपासून एरियर मिळणार आहे. सातवा वेतन आयोग २०१६ रोजी लागू झाला होता. यासाठी सहा महिन्यांचा एरियर दिला होता. त्यानंतर आता आठवा वेतन आयोग २०२८ मध्ये लागू होऊ शकतो. त्यामुळे दोन वर्षांचा एरियर मिळू शकतो.

AITUC च्या मागण्या

  • आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर कमीत कमी ३.० ठेवण्याची मागणी

  • जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी

  • दर ५ वर्षांनी पेन्शनमध्ये ५ टक्क्यांची वाढ

  • केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वार्षिक इंक्रिमेंट कमीत कमी ६ टक्क्यांनी वाढवण्याची मागणी

  • फॅमिली युनिट ३ वरुन ५ करण्याची मागणी

  • पेन्शन कम्युटेशनची पुनर्स्थापन १५ वर्षांवरुन ११-१२ वर्ष करण्याची सूचना

  • ३० वर्षांच्या सेवेत किमान ५ पदोन्नतींची मागणी

  • इंटरनेटच्या तांत्रिक गरजांचा खर्च पगारात समाविष्ट करण्याची मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Low Blood Pressure: उभं राहताना किंवा उठताना अचानक चक्कर येते? BPच्या रुग्णांनी वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितलं महत्वाचं कारण

Sambhajinagar Politics: भाजपची खेळी! शिंदेसेनेला सतेतेपासून दूर ठेवलं; ठाकरेंच्या २ सदस्यांना फोडलं

Maharashtra Live News Update : परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष पदी भाजपच्या लता विजयकुमार वाकळे

Dhurandhar 2: पहिल्याच दिवशी २०० कोटी तर एका आठवड्यात ५०० कोटी; रणवीर सिंगचा 'धुरंधर २' करणार नवा रेकॉर्ड

गारपिटीचा मोठा तडाखा! डोळ्या देखत द्राक्षाचे नुकसान, बळीराजाच्या डोळ्यात अश्रु|VIDEO

SCROLL FOR NEXT