DA Hike Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी ३ वेळा वाढणार महागाई भत्ता

8th Pay Commission DA Hike: आठवा वेतन आयोग लागू होण्यासाठी अजून वेळ आहे. आयोगाला शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी दिला आहे. या कालावधीत ३ वेळा महागाई भत्ता वाढणार आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाआधी वाढणार तीन वेळा महागाई भत्ता

७ व्या वेतन आयोगाअंतर्गत मिळणार महागाई भत्ता

महागाई भत्त्याचा थेट परिणाम मूळ वेतनावर होणार

केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे. यानंतर आयोग या आधारे कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याबाबत शिफारसी जारी करतील. यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केले आहे. यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाणार आहे. या शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, या कालावधीत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढणार की नाही असा प्रश्न पडला आहे.

वर्षभरात दोनदा महागाई भत्ता वाढतो. आता आठव्या वेतन आयोगातील शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत दिली आहे. म्हणजेच या कालावधीत तीनदा महागाई भत्ता वाढणार आहे. मात्र, सातवा वेतन आयोग डिसेंबर महिन्यात संपणार आहे. त्यामुळे कोणत्या आयोगाअंतर्गत महागाई भत्ता वाढणार असा प्रश्न विचारला जात आहे.

या कालावधीत ७ व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता आणि अलाउंस वाढणार आहे. याचसोबत आठव्या वेतन आयोगानुसार एरियार २०२६ जानेवारीपासून मिळणार आहे.

कधी मिळणार महागाई भत्ता?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ८वा वेतन आयोग लागू होईपर्यंत ७ व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता दिला जाणार आहे. जोपर्यंत नवीन वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत ७ वा वेतन आयोग लागू असणार आहे. दर ६ महिन्यांनी महागाई भत्ता वाढतो. १८ महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा महागाई भत्ता वाढणार आहे. दरम्यान, जुलै महिन्याला ५८ टक्के महागाई भत्ता आहे. पुढच्या तीन वेळी जरी प्रत्येकी ३ टक्के महागाई भत्ता वाढला तर तो ६७ होऊ शकतो.

महागाई भत्त्याचा परिणाम फिटमेंट फॅक्टरवर होणार

ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉयीज फेडरेशनचे अध्यक्ष मनजीत सिंह पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवा वेतन लागू होण्याआधी महागाई भत्ता वाढणार आहे. याचा परिणाम थेट कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीवर होणार आहे. दर फॅमिली युनिटसाठी महागाई भत्ता ३ वरुन ३.५ केला तर बेसिक सॅलरीवर २० टक्क्यांनी परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate : सोन्याचे भाव अचानक बदलले; एका दिवसात दराने पलटली बाजी; आजचा एक तोळ्याचा भाव किती?

Banarasi Saree : अस्सल बनारसी साडी ओळखण्याच्या ७ ट्रिक्स

Shocking : भंडाऱ्यात हत्येचा थरार! धारदार शास्त्राने हत्या केली, मृतदेह रेल्वेरुळाजवळ नाल्यात फेकला

Maharashtra Politics: विदर्भात मोठी राजकीय घडामोड, काँग्रेसला खिंडार; २२१ पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

De De Pyaar De 2 Collection : अजय देवगणचा 'दे दे प्यार दे 2' सिनेमा 50 कोटींच्या उंबरठ्यावर, मंगळवारी कमाई किती?

SCROLL FOR NEXT