8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: २५००० वरुन थेट ७१५०० रुपये, आठव्या वेतन आयोगात कोणाचा पगार कितीने वाढणार?

8th Pay Commission Salary Increase Calculation: आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आपल्या शिफारशी सादर करतील त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाणार आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाला मंजुरी

समिती १८ महिन्यात सादर करणार शिफारसी

पगारात कितीने होणार वाढ

केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून त्यासाठी समितीदेखील स्थापन केली आहे. आता आठव्या वेतन आयोगाअंतर्गत टर्म ऑफ रेफरंसला मंजुरी दिली आहे. यानंतर ही समिती १८ महिन्यात त्यांच्या शिफारसी सादर करणार आहे. त्यानंतर आठव्या वेतन आयोगाबाबत निर्णय घेतला जाईल. दरम्यान १ जानेवारी २०२६ पासून हा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे.

टर्म ऑफ रेफरंस काय आहे? (Term of Reference Under 8th Pay Commission)

टर्म ऑफ रेफरंस हे असं कागदपत्र आहे की ज्यात आयोग कसं काम करणार, त्यासाठी किती वेळ लागणार याबाबत माहिती दिलेली असते. या वेतन आयोगाला मंजुरी दिल्यानंतर तुमचा पगार कितीने वाढणार हे समजणार आहे. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढू शकतो ते जाणून घ्या.

ज्या प्रकारे सातव्या वेतन आयोगात पगार वाढवला गेला. त्याच फॉर्म्युलानुसार आठव्या वेतन आयोगात पगार वाढण्याची शक्यता आहे. सातवा वेतन आयोग लागू झाला तेव्हा कमीत कमी बेसिक सॅलरी ७००० रुपयांवरुन १८००० रुपये झाली होती. यात आता वाढ होण्याची शक्यता आहे.

पगारवाढीचे कॅल्क्युलेशन (Salary Calculation)

आठव्या वेतन आयोगातील पगार हा फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असतो. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होती. आठव्या वेतन आयोगात हा फिटमेंट पॅक्टर २.८६ होऊ शकतो. त्यानुसार पगार कितीने वाढणार. नवीन वेतन आयोग लागू होताना महागाई भत्ता हा ० होतो. त्यानंतर तो वाढतो. सध्या सातव्या वेतन आयोगात महागाई भत्ता ५८ आहे.७व्या वेतन आयोगातील पगार

बेसिक सॅलरी-२५०००

डीए-१४५००

एचआरए-६७५० रुपये

एकूण पगार-४६,२५० रुपये

आठव वेतन आयोग

बेसिक सॅलरी- २५००० वर २.८६ फिटमेंट फॅक्टरनुसार- ७१५००

डीए-०

एचआरए-१९३०५

एकूण पगार- ९०८५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Manoj Jarnage: बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मनोज जरांगेंचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा| VIDEO

Gold Price: 'या' १० कारणांमुळे सोनं होतेय स्वस्त; दिवाळीनंतर तब्बल ₹१०,३७० नी घसरण, आता गोल्ड खरेदी करणं योग्य?

Winter Lip Care: कोरड्या हवेमुळे ओठ काळे पडतायेत? जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय

Local Body Election : राज्यातील निवडणुकीसाठी आयोगाचा नवा प्लान, तब्बल २०० कोटींचा खर्च वाढला, आचारसंहिता कधी लागणार?

SCROLL FOR NEXT