8th Pay Commission Salary meta ai
बिझनेस

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.57 मिळाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! वाचा संपूर्ण गणित

8th Pay Commission Salary: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.० ते २.५७ असेल तर Level 6, 7 आणि 8 कर्मचाऱ्यांचा अंदाजे बेसिक पगार किती असेल हे जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

आठव्या वेतन आयोगाबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सध्या आयोग विविध भागात जाऊन तिथल्या कर्मचारी संघटना आणि संबंधित व्यक्तींशी चर्चा करत आहे. आज ७ ऑक्टोबर रोजी कर्नाटक, बंगळूरू या ठिकाणी होणार आहेत. या बैठकीतून कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत बदल आणि पेन्शनमध्ये बदल करणार्‍याबाबत शिफारशी केल्या जाणार आहेत.

आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असेल, याकडे कर्मचाऱ्यांचं जास्त लक्ष आहे. कारण फिटमेंट फॅक्टरच्या आधारे नवीन बेसिक पगार ठरवला जाऊ शकतो. पण सध्या कोणताही अंतिम आकडा ठरलेला नाही.

कर्मचारी संघटनांची मागणी काय?

केंद्रीय कर्मचारी संघटना NC-JCM ने ३.८३३ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यावर सातव्या वेतन आयोगातली १८.००० रुपयांची बेसिक सॅलरी वाढून ६९,००० रुपये होऊ शकते. AIDEF, FNPO आणि AINPSEF यासोबत काही संघटनांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. तर IRTSA कडून वेगवेगळे पे लेव्हलसाठी ५.० पर्यंत फिटमेंट फॅक्टरची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, AINPSEF चे राष्ट्रीय अध्यक्ष मनजीत सिंह पटेल यांच्या मते, सध्याचा महागाई भत्ता आणि इतर वेतनविषयक घटक पाहता २.१ फिटमेंट फॅक्टरची शक्यता व्यक्त केली जातेय. पण अंतिम निर्णय सरकारच्या अधिसूचनेनंतरच स्पष्ट होईल.

लेव्हल ६ कर्मचाऱ्यांचा अंदाजे बेसिक पगार

सध्याचा बेसिक सॅलरी ३५,४०० आहे. फिटमेंट फॅक्टरनुसार तो असा होऊ शकतो:

२.० : ७०,८००

२.१५ : ७६,११०

२. २८ : ८०, ७१२

२.५७ : ९०,९७८

लेव्हल ७ कर्मचाऱ्यांचा अंदाजे बेसिक पगार

सध्याची बेसिक सॅलरी ४४,९०० आहे.

२.० : ८९,८००

२.१५ : ९६,५३५

२.२८ : १.०२,३७२

२.५७ :१,१५,३९३

लेव्हल ८ कर्मचाऱ्यांची अंदाजे बेसिक सॅलरी

सध्याची बेसिक ४७,६०० आहे.

२.० : ९५,२००

२.१५ : १,०२,३४०

२.२८ : १,०८,५२८

२.५७ :१,२२,३३२

महत्त्वाचं म्हणजे हे सर्व आकडे अंदाजे गणितावर आधारित आहेत. आठव्या वेतन आयोगाचा अंतिम फिटमेंट फॅक्टर आणि नवीन वेतनश्रेणी सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी झाल्यानंतरच निश्चित होईल. त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांनी या आकड्यांना संभाव्य पगार म्हणूनच पाहावं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Tea Side Effects: सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने ॲसिडीटी होते का? आरोग्यावर होणारे 5 परिणाम जाणून घ्या

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये आणखी एक दुष्काळाचा बळी; नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसवर CBI चा छापा! OSD वर गुन्हा दाखल, राजकारणात मोठा भूकंप

Blood sugar test: घरी ब्लड शुगर टेस्ट करताना सुई टोचल्यावर काय करावं? 'ही' 1 चूक करणं आजच थांबवा

Rain Alert : राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, कोकणासह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान विभागाचा नेमका इशारा काय?

SCROLL FOR NEXT