DA Hike meta ai
बिझनेस

DA Hike: सरकारी कर्मचारी अन् पेन्शनधारकांची लॉटरी! महागाई भत्त्यात मोठी वाढ; पाहा किती वाढणार पगार?

Government Employees : सरकारने सरकारी आणि पेन्शनर्सना मोठा दिलासा देत DA-DR वाढवला आहे. नवे दर १ जानेवारीपासून लागू होतील.

Sakshi Sunil Jadhav

तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारने राज्यातल्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने महागाई महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) वाढवण्याचा निर्णय घेतला असून, या नवीन दरांचा लाभ १ जानेवारीपासून लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णयाला फायदा सिक्कीममधले ५० हजार कर्मचारी आणि पेन्शनर्सना होण्याची शक्यता आहे.

सरकारच्या जारी केलेल्या परिपत्रकानुसार, प्री-रिवाइज्ड बेसिक पे स्ट्रक्चरनुसार सॅलरी किंवा पेन्शन घेणाऱ्यांसाठी DA आणि DR चा दर २५७ टक्क्यांवरून २६२ टक्के करण्यात आला आहे. तर रिवाइज्ड बेसिक पे स्ट्रक्चर अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी हा दर ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच या श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना २ टक्के पॉइंटचा फायदा मिळणार आहे.

कोणाला मिळणार लाभ?

हा निर्णय फक्त नियमित सरकारी कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नाही. रिवाइज्ड पे स्ट्रक्चरनुसार नियमित वेतनश्रेणीत काम करणारे कंत्राटी कर्मचारी आणि वर्क-चार्ज्ड एस्टॅब्लिशमेंटमधले कर्मचारी सुद्धा या वाढीच्या कक्षेत आहेत. तसेच सिक्कीममध्ये कार्यरत ऑल इंडिया सर्व्हिस (AIS) अधिकाऱ्यांनाही वाढीव DA चा लाभ मिळणार आहे.

AIS अधिकाऱ्यांसाठीही वाढ

सहाव्या केंद्रीय वेतन आयोगावर आधारित प्री-रिवाइज्ड पे बँड आणि ग्रेड पे स्ट्रक्चर असलेल्या AIS अधिकाऱ्यांचा DA २५७ टक्क्यांवरून २६२ टक्के झाला आहे. तर सातव्या वेतन आयोगाच्या रिवाइज्ड बेसिक पे स्ट्रक्टरनुसार वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी DA ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात आला आहे.

एरियर्सही मिळण्याची शक्यता

नवीन दर १ जानेवारीपासून लागू असल्याने वाढीव रक्कम नंतर मिळाल्यावर त्या कालावधीचा एरियर्स मिळू शकतो. पण एरियर्सची प्रत्यक्ष रक्कम संबंधित कर्मचाऱ्याच्या बेसिक पे किंवा पेन्शनवर आणि लागू नियमांवर अवलंबून असेल.

सरकारने रक्कम राउंड ऑफ करण्याचे नियमही स्पष्ट केलेले आहेत. ५० पैसे किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम पुढच्या पूर्ण रुपयात, तर ५० पैशांपेक्षा कमी रक्कम दुर्लक्षित केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंगोलीत फटाक्याच्या आगीत नगर परिषदेचे तीन कर्मचारी गंभीररित्या जखमी

Moving car safety: धावत्या गाडीत सीट बदलणं का धोकादायक? जाणून घ्या

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! परदेशातील डिग्री, पण भारतात बनावट नोंदणी; बुलढाण्यातील २ नामांकित डॉक्टरांना बेड्या

Bollywood Actor : बॉलिवूड अभिनेत्याचा भयंकर स्टंट! १५ मिनिटं श्वास रोखून धरला; लाइव्ह इव्हेंटमध्ये उपस्थितांची उडाली झोप | VIDEO

Pitru Paksha : पितृपक्षात आवर्जून बनवा भोपळ्याची भाजी, कांदा-लसूणशिवायही लागेल एकदम चविष्ट

SCROLL FOR NEXT