IAS Transfer: IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल, कोणाची कुठे झाली पोस्टिंग?

IAS Transfer in Maharashtra: महाराष्ट्र सरकारने तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेत. अतुल नीलकंठ पाटणे, शैला ए आणि स्वाती योगेश म्हसे पाटील यांचा बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.
Maharashtra government transfers three IAS officers
Maharashtra government transfers three IAS officerssaam tv
Published On: 
Summary
  • महाराष्ट्र सरकारकडून तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे नवीन आदेश

  • अतुल नीलकंठ पाटणे यांच्यासह तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र सरकारनं राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तीन अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आलेत. प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी सरकारनं महत्त्वपूर्ण प्रशासकीय फेरबदल करण्यात आलाय. अतुल नीलकंठ पाटणे, शैला ए , स्वाती योगेश म्हसे पाटील अशी बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. सरकारी सूत्रांनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाच्या अंतर्गत सुशासन सुधारणे हा या फेरबदलाचा उद्देश आहे.

Maharashtra government transfers three IAS officers
महाराष्ट्रातील प्रसिद्ध हास्यकलाकाराचं निधन; नाट्य आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा

श्री अतुल नीलकंठ पाटणे (आयएएस:आरआर:१९९९) - प्रधान सचिव (प्रशासकीय नवोपक्रम, उत्कृष्टता आणि सुशासन), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई, यांची नियुक्ती प्रधान सचिव (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.

श्रीमती. शैला ए (IAS: आरआर) (वस्त्र), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांची सचिव GOM, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीमती स्वाती योगेश म्हसे पाटील (आयएएस:एससीएस:२००८) यांच्या १७.०८.२०२६ रोजीच्या आदेशात बदल करून, त्यांची नियुक्ती सचिव (प्रशासकीय नवोपक्रम, उत्कृष्टता आणि सुशासन), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.

Maharashtra government transfers three IAS officers
Maharashtra Lift Rules : महाराष्ट्रात लिफ्ट वापरण्याचे नियम कडक! 12 वर्षांखालील मुलांना एकट्याने लिफ्ट वापरण्यास बंदी; सोसायटीची जबाबदारी वाढली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.